विमानात विना इअरफोन गाणी वाजवताय? सावधान! थेट जेलची हवा खावी लागणार; सरकारने नियमावली केली जाहीर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 18:50 IST2026-02-13T18:44:18+5:302026-02-13T18:50:29+5:30

विमानात अशा प्रकारे गोंधळ घालणाऱ्या किंवा इतरांना त्रास देणाऱ्या प्रवाशांवर 'शिस्तभंग' केल्याचा शिक्का मारला जाऊ शकतो आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसह प्रवासावर बंदीही घातली जाऊ शकते.

Playing songs without earphones on a plane? Be careful! You will have to breathe prison air; Government announces regulations! | विमानात विना इअरफोन गाणी वाजवताय? सावधान! थेट जेलची हवा खावी लागणार; सरकारने नियमावली केली जाहीर!

AI Generated Image

विमान प्रवास करताना अनेकदा काही प्रवासी विना इअरफोन मोठ्या आवाजात संगीत ऐकतात किंवा चित्रपट पाहतात. यामुळे सहप्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेता, सरकारने आता कडक भूमिका घेतली आहे. विमानात अशा प्रकारे गोंधळ घालणाऱ्या किंवा इतरांना त्रास देणाऱ्या प्रवाशांवर 'शिस्तभंग' केल्याचा शिक्का मारला जाऊ शकतो आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसह प्रवासावर बंदीही घातली जाऊ शकते.

लोकसभेत रंगली चर्चा

खासदार व्ही. एस. माथेस्वरण यांनी लोकसभेत विमान प्रवासातील वाढत्या त्रासाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. "विमानात विना इअरफोन गाणी वाजवणाऱ्या प्रवाशांवर सरकार काय कारवाई करते? यासाठी काही नवीन नियम आणले जाणार का? तसेच विमानात व्हिडिओ बनवणाऱ्या ब्लॉगरवर बंदी आहे का?" असे प्रश्न त्यांनी विचारले होते.

नागरी उड्डाण मंत्र्यांनी काय दिले उत्तर?

या प्रश्नांना उत्तर देताना नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नियमावली स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, "विमान नियम १९३७ मधील नियम २२, २३ आणि २९ नुसार प्रवाशांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवले जाते. 'नागरी उड्डाण आवश्यकता'नुसार, जर एखादा प्रवासी विमानाच्या क्रू मेंबर्सच्या कामात अडथळा आणत असेल, मालमत्तेला धोका निर्माण करत असेल किंवा इतर प्रवाशांना शारीरिक/मानसिक त्रास देत असेल, तर तो गुन्हेगारी कारवाईस पात्र ठरतो."

विमानातील फोटोग्राफी आणि व्हिडिओवर बंदी?

आजकल सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि ब्लॉगर्स विमानात व्हिडिओ बनवताना दिसतात. यावर स्पष्टीकरण देताना मंत्र्यांनी सांगितले की, विमान नियम १९३७ मधील नियम १३ नुसार, विमानतळ परिसर आणि विमानात उड्डाणादरम्यान पूर्वपरवानगीशिवाय फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी करणे प्रतिबंधित आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे अधिकार एअरलाईन्सना देण्यात आले आहेत.

एअरलाईन्सची जबाबदारी काय?

प्रवाशांच्या मनोरंजनासाठी एअरलाईन्स स्वतःहून 'इन-फ्लाइट एंटरटेनमेंट' अंतर्गत सौम्य संगीत वाजवतात. मात्र, वैयक्तिक उपकरणांवर मोठ्या आवाजात आवाज करणे हा बेशिस्तपणा मानला जातो. अशा प्रवाशांना 'नो-फ्लाय लिस्ट'मध्ये टाकण्याचा अधिकारही विमान कंपन्यांकडे आहे.

Web Title : विमान में बिना इयरफ़ोन संगीत? जेल की हवा खानी पड़ सकती है!

Web Summary : विमान में बिना इयरफ़ोन के तेज़ संगीत बजाने पर अब जुर्माना, यात्रा प्रतिबंध और नो-फ्लाई सूची में नाम आ सकता है। यात्रियों की परेशानी रोकने और उड़ान सुरक्षा सुनिश्चित करने के लिए नियम सख्त किए जा रहे हैं।

Web Title : No earphones, loud music on planes? Jail time possible!

Web Summary : Loud music without earphones on flights can now lead to penalties, potential travel bans, and even being added to the no-fly list. Rules are being strictly enforced to prevent passenger disturbance and ensure flight safety.