हवेत असतानाच विमानाचं इंजिन फेल? दिल्ली विमानतळावर आणीबाणी, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, वाचले १६१ प्रवाशांचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 13:06 IST2026-03-28T13:05:19+5:302026-03-28T13:06:36+5:30

IGI Airport Full Emergency: वैमानिकाने दाखवलेलं प्रसंगावधान आणि विमानतळ प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे दिल्लीमधील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी सकाळी मोठी दुर्घटना टळली.

Plane engine fails in mid-air? Emergency at Delhi airport, but pilot shows caution, saves lives of 161 passengers | हवेत असतानाच विमानाचं इंजिन फेल? दिल्ली विमानतळावर आणीबाणी, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, वाचले १६१ प्रवाशांचे प्राण

हवेत असतानाच विमानाचं इंजिन फेल? दिल्ली विमानतळावर आणीबाणी, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, वाचले १६१ प्रवाशांचे प्राण

वैमानिकाने दाखवलेलं प्रसंगावधान आणि विमानतळ प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे दिल्लीमधील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी सकाळी मोठी दुर्घटना टळली. विशाखापट्टणम येथून दिल्लीला येत असलेल्या इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळाली. विमानाचं इंजिन फेल झालं असण्याची शक्यता निर्माण झाल्याने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर फुल एमरजन्सी घोषित करण्यात आली. विमानातून प्रवास करत असलेल्या १६१ प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. अशा परिस्थितीत वैमानिकानं दाखवलेलं प्रसंगावधान आणि विमानतळ प्रशासनाच्या तत्परतेमुळे पुढची दुर्घटना टळली.

आपातकालीन प्रोटोकॉलदरम्यान, इंडिगोच्या विमानाने सकाळी १० वाजून ५४ मिनिटांनी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या २८ क्रमांकाच्या रनवेवर सुखरूपपणे लँडिंग केलं. विमानाने लँडिंग केलं तेव्हा कुठल्याही प्रकारच्या दुर्घटनेचा सामना करण्यासाठी विमानतळावर अग्निशमन दलाची वाहने आणि रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार या विमानामध्ये एकूण १६१ प्रवासी प्रवास करत होते. विमान उतरल्यानंतर सर्व प्रवाशांना विमानातून सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. प्रवाशांची तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांना पुढच्या प्रवासासाठी रवाना करण्यात आले. इंडिगो प्रशासनाकडून आता या तांत्रिक बिघाडाची सखोल चौकशी केली जात आहे.  
 

Web Title : दिल्ली में विमान का इंजन फेल, पायलट ने बचाई 161 यात्रियों की जान।

Web Summary : दिल्ली हवाई अड्डे पर इंडिगो विमान का इंजन फेल होने से बड़ा हादसा टला। पायलट की सूझबूझ से विमान सुरक्षित उतरा, 161 यात्री सुरक्षित। सभी यात्रियों को सुरक्षित निकाला गया, जांच जारी।

Web Title : Pilot saves 161 as plane engine fails mid-air in Delhi.

Web Summary : A pilot's quick thinking averted disaster at Delhi airport after an IndiGo plane experienced engine failure mid-air. An emergency was declared, but the plane landed safely with 161 passengers. All passengers were safely evacuated, and an investigation is underway.