India-Pakistan: “पाकिस्तानचं विभाजन करण्याचा प्लॅन १९६५ मध्येच; फक्त अंमलबजावणी १९७१ च्या युद्धात झाली”
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 11:06 IST2021-10-24T11:00:44+5:302021-10-24T11:06:29+5:30
नौदल अधिकारी अनिल कुमार चावला हे १९७१ भारत-पाकिस्तान युद्धाच्या विजयाची गोल्डन जुबली सेलिब्रेशनसाठी आयोजित कार्यक्रमात बोलत होते

India-Pakistan: “पाकिस्तानचं विभाजन करण्याचा प्लॅन १९६५ मध्येच; फक्त अंमलबजावणी १९७१ च्या युद्धात झाली”
बंगळुरू – भारताने पूर्व पाकिस्तानला पश्चिमी पाकिस्तानपासून(Pakistan) वेगळं करण्याचा विचार १९६५ मध्ये सुरु केला होता. क्लासिफाइड कागदपत्रांचा हवाला देत या गोष्टीला पुरावा दिला आहे. उत्तर पूर्वेकडे दहशतवादी कारवायांना ISI प्रोत्साहन दिल्यामागे हे मोठं कारण होतं असा खुलासा नौदलाचे दक्षिण फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ वाइस एडमिरल अनिल कुमार चावला यांनी केला आहे.
नौदल अधिकारी अनिल कुमार चावला हे १९७१ भारत-पाकिस्तान युद्धाच्या विजयाची गोल्डन जुबली सेलिब्रेशनसाठी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. भारताने पाकिस्तानला १९७१ च्या लढाईत मात दिली होती. त्यानंतर पूर्व पाकिस्तानात नवीन सरकार उभं करण्यास मदत केली. त्यानुसार बांग्लादेश(Bangladesh) अस्तित्वात आला. १९६५ च्या युद्धानंतर पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान वेगळा कसा करायचा याचा विचार सुरू झाला असं त्यांनी सांगितले.
तसेच त्यावेळी भारत(India) कमकुवत होता कारण काँग्रेसचं विभाजन झालं होतं. इंदिरा गांधी कशातरी पंतप्रधान बनल्या. विरोधी पक्षाने गुंगी बाहुली म्हणून इंदिरा गांधींना हिणवू लागले. त्यामुळे इंदिरा जास्त काळ टिकतील असं वाटत नव्हतं. १९६९ मध्ये यहिया खानने टिक्का खानकडून सत्ता मिळवली होती. १९५४ वन यूनिट जियोपॉलिटिकल प्रोग्राम भंग करण्याची कहानी सुरु झाली. १९७० मध्ये निवडणुकीची घोषणा झाली अशी माहितीही अनिल कुमार चावला यांनी दिली.
त्याशिवाय १९७० ची निवडणुकीत ही पाकिस्तानातील पहिली निवडणूक होती ज्यात वन पर्सन वन वोट नियम लागू करण्यात आला. इंदिरा गांधी यांनी भारतात १९७१ मध्ये दीडवर्षापूर्वीच निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. डिसेंबर १९७० मध्ये अचानक सर्वकाही बदललं. पूर्व पाकिस्तानात शेख मजीबूर रहमान यांनी १६० जागा जिंकल्या तर पश्चिम पाकिस्तानात भुट्टो यांना केवळ ८१ जागांवर विजय मिळाला. रहमान यांना पंतप्रधानपदाचा उत्तराधिकारी मानलं गेले.
कारवाई करण्यास भारत का सज्ज झाला?
वाइस एडमिरल चावला यांच्यानुसार, १९६५ मध्ये पाकिस्तानचे दोन भाग करणं हा विचार पहिल्या टप्प्यात होता. ३० जानेवारी १९७१ मध्ये काश्मीरी दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचं अपहरण करून लाहौरला घेऊन जाणं टर्निंग पॉईंट ठरलं. भारताने ओवरफ्लाइट सुविधा थांबवली. त्यामुळे पूर्व पाकिस्तानमध्ये हत्यारं घेऊन जाण्यास रोखलं गेले. कोलंबोहून उड्डाण करणं कठीण आणि खर्चिक होतं. रहमान निवडणुकीत जिंकूनही पंतप्रधान बनू दिलं नाही. तेव्हा रहमान यांनी स्वातंत्र्याची घोषणा केली. भारताने एप्रिल १९७१ मध्ये युद्धात दखल देण्यास सुरुवात केली.७ मार्चला इंदिरा गांधी यांनी बहुमताने केंद्रात सत्ता मिळवली. त्यामुळे अनेक गोष्टी बदलल्या. भारत की दुर्गा असं इंदिरा गांधी यांना म्हटलं गेले. १९७१ चं युद्धात सर्व प्रकारच्या सिद्धांतांचे पालन झाले असं अनिल कुमार चावला म्हणाले.