शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
6
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
7
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
8
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
9
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
10
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
11
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
12
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
13
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
14
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
15
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
16
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
17
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
18
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
19
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
20
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी

'मुंबईतील बैठकीत योजना, मग सनातनचा अपमान...', भाजपचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 13:56 IST

सनातन धर्माबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या मुद्द्यावरुन भाजप नेते आक्रमक झाले आहेत.

नवी दिल्ली: सनातन धर्माच्या अपमानाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. या मुद्द्यावरुन भाजप काँग्रेस आणि 'इंडिया' आघाडीवर निशाण साधत आहे. एवढंच नाही तर मुंबईतील 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत रणनीती आखल्यानंतर विरोधी नेत्यांचे सनातनविरोधात वक्तव्य आल्याचा आरोप भाजपने केला आहे. 

भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ट्विट करुन सोनिया आणि राहुल गांधी यांना यावर खुलासा करण्यास सांगितले आहे. भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांनीही सनातन धर्माला बदनाम करण्यासाठी इंडिया आघाडी स्थापन करण्यात आल्याचा आरोप केला. या मुद्द्यावर सोनिया गांधी, लालू प्रसाद यादव आणि अखिलेश यादव यांच्या मौनावरही रविशंकर यांनी प्रश्न उपस्थित केला.

जेपी नड्डा यांनी ट्विट केले की, "I.N.D.I.A आघाडीच्या मुंबईतील बैठकीनंतर उदयनिधी स्टॅलिन यांचे वक्तव्य, त्यानंतर प्रियांक खर्गे यांचा सनातनवर हल्ला आणि आज द्रमुकच्या मंत्र्याने मान्य केले की, सनातन धर्माचा विरोध करण्यासाठी इंडिया आघाडी स्थापन केली आहे. सोनिया गांधी, राहुल आणि काँग्रेसने विचारपूर्वक आखलेली रणनीती आहे. "

"या विधानावर काँग्रेस आणि I.N.D.I.A ने आपले मत स्पष्ट करावे, त्यांनी सांगावे की, कोणत्याही धर्माबाबत आक्षेपार्ह विधान करण्याचा घटनेत अधिकार आहे का? I.N.D.I.A आघाडीच्या लोकांना संविधानातील तरतुदी माहित नाहीत का? I.N.D.I.A, काँग्रेस, सोनिया आणि राहुल यांनी सांगावे प्रेमाच्या दुकानाच्या नावाखाली सनातन धर्माच्या विरोधात द्वेषाचा माल का विकला जातोय? हा द्वेषाचा मेगा मॉल फक्त सत्तेसाठी आहे. फूट पाडा आणि राज्य करा," अशी टीका नड्डा यांनी केली.

सनातनचा अपमान करणे हा 'इंडिया'चा अजेंडा दरम्यान, रविशंकर प्रसाद म्हणाले, "अहंकारी आघाडीचे लोक सनातन धर्मावर प्रश्न विचारत आहेत. या मुद्द्यावर आम्ही सोनिया, राहुल आणि प्रियंका यांना प्रश्न विचारला. पण त्याच्याकडून काहीच उत्तर आले नाही. सनातनला विरोध करणे हा आघाडीचा अजेंडा आहे. इतर कोणत्याही धर्मावर बोलण्याची हिंमत काँग्रेसमध्ये आहे का? हे लोक व्होट बँकेसाठी सनातनवर बोलत आहेत. इतर धर्मांबाबत गप्प आहेत. काँग्रेसचा एकही मोठा नेता रामजन्मभूमीला भेट देण्यासाठी गेला नाही. आम्ही सोनिया गांधींना स्पष्टपणे सांगू इच्छितो की, भारत सनातनचा अपमान सहन करणार नाही. हिंदू धर्माचा अपमान सहन करणार नाही", अशी टीका रविशंकर प्रसाद यांनी केली. 

 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसDravid Munnetra Kazhagamद्रविड मुनेत्र कझागमINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण