देशातील प्रत्येक नागरिकाला रिलीफ फंडातून मिळणार 7500 रुपये?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 04:06 PM2020-06-11T16:06:43+5:302020-06-11T16:18:14+5:30

विनामूल्य मदत निधी मिळविण्यासाठी एक लिंक देण्यात आला आहे. यात 7500 रुपये कसे मिळणार हे सांगण्यात आलं आहे. पीआयबी फॅक्ट टीमने हा दावा खोटा ठरवला आहे. 

pib fact check whatsapp message claims 7500 relief fund citizen | देशातील प्रत्येक नागरिकाला रिलीफ फंडातून मिळणार 7500 रुपये?

देशातील प्रत्येक नागरिकाला रिलीफ फंडातून मिळणार 7500 रुपये?

googlenewsNext

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये घरबसल्या सोशल मीडियाचा वापर देखील मोठ्या प्रमाणात केला जात आहे. याच दरम्यान कोरोना संदर्भातील अफवाही वेगाने पसरत आहेत. अनेक गोष्टी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. अशातच आता Whatsapp वर प्रत्येक नागरिकाला 7,500 रुपये मिळत असल्याची चर्चा आहे. 

FG Lockdown Fund अंतर्गत लोकांना रिलीफ फंड दिला जात आहे. यामध्ये प्रत्येक नागरिकाला 7500 रुपयांचा मदतनिधी देण्यात येत आहे असा दावा Whatsapp च्या व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आला आहे.  एफजी लॉकडाऊन फंडामधून लोकांना 7500 रुपये दिले जात आहेत. एफजीने विनामूल्य पैसे वितरित करण्यास मान्यता दिली आहे. विनामूल्य मदत निधी मिळविण्यासाठी एक लिंक देण्यात आली आहे. यात 7500 रुपये कसे मिळणार हे सांगण्यात आलं आहे. पीआयबी फॅक्ट टीमने हा दावा खोटा ठरवला आहे. 

मेसेजमध्ये देण्यात आलेल्या  लिंकवर क्लिक केल्यानंतर वैयक्तिक माहिती देणं गरजेचं आहे. ही ऑफर मर्यादित असून पैसे मिळवण्यासाठी लवकरात लवकर हे करा असं देखील व्हायरल मेसेजमध्ये सांगण्यात आलं आहे. भारत सरकारच्या प्रेस इंफॉर्मेशन ब्यूरो (PIB) ने हा दावा फेटाळून लावला आहे. PIB फॅक्ट चेकच्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे. मेसेजमध्ये दिलेली लिंक Clickbait आहे. अशा फसव्या वेबसाईट्स आणि Whatsapp  वरील मेसेजपासून सावध राहा असं पीआयबीने म्हटलं आहे. 

पीआयबी फॅक्ट चेकमध्ये हा व्हायरल मेसेज फेक असल्याचं सिद्ध झालं आहे. अशा मेसेजपासून सावध राहा, अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकतं असं सांगण्यात आलं आहे. या व्यतिरिक्त आणखी एक मेसेज व्हायरल होत आहे ज्यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना 10 हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जात आहे. सरकारचा राष्ट्रीय शिष्यवृत्ती 2020च्या माध्यमातून महाविद्यालय विद्यार्थ्यांना दहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती देत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र तो मेसेजही फेक असल्याचं समोर आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : धोक्याची घंटा! कोरोनामुळे जगात तब्बल 10 कोटी लोकांचा होऊ शकतो मृत्यू

भारीच! Twitter ने लाँच केलं इन्स्टासारखं 'हे' भन्नाट फीचर

अरे व्वा! सिंहांची संख्या वाढली; पंतप्रधानांनी दिली देशवासियांना आनंदाची बातमी

CoronaVirus News : 'हा' रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा सर्वात कमी धोका; रिसर्चमधून खुलासा

Jammu And Kashmir : सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच; एक जवान शहीद

भारतीय लष्कराला सलाम! चीनच्या तज्ज्ञांनीही केलं भरभरून कौतुक!!

CoronaVirus News : अंधश्रद्धेनेच घात केला, कोरोनावर उपचार करणाऱ्या भोंदूबाबाचा मृत्यू झाला; परिसरात खळबळ

CoronaVirus News : पावसाळ्यात कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने होणार?; IIT चा चिंता वाढवणारा रिसर्च

 

Web Title: pib fact check whatsapp message claims 7500 relief fund citizen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.