Fact Check : Corona Vaccine चे दोन डोस घेतलेल्यांसाठी आता खूशखबर, मोदी सरकार देतंय 5000 रुपये? 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 02:53 PM2022-07-13T14:53:58+5:302022-07-13T15:01:58+5:30

Corona Vaccine Fact Check : कोरोना लस घेणाऱ्यांना मोदी सरकारकडून पैसे मिळणार असल्याचा दावा केला जात आहे.

pib fact check viral message covid vaccine get 5k rupees central government | Fact Check : Corona Vaccine चे दोन डोस घेतलेल्यांसाठी आता खूशखबर, मोदी सरकार देतंय 5000 रुपये? 

Fact Check : Corona Vaccine चे दोन डोस घेतलेल्यांसाठी आता खूशखबर, मोदी सरकार देतंय 5000 रुपये? 

Next

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा चार कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 16,906 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 45 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,25,519 लोकांना जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान कोट्यवधी लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. देशातील अनेक लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. असं असताना सोशल मीडियावर एक मेसेज जोरदार व्हायरल होत आहे. 

कोरोना लस घेणाऱ्यांना मोदी सरकारकडून पैसे मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना केंद्र सरकारकडून 5000 रुपये दिले जाणार असल्याचा मेसेज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये सांगितलं जात आहे की, ज्यांनी कोरोना लस घेतली आहे, त्यांना फक्त एक फॉर्म भरावा लागेल आणि त्यानंतर सरकार तुम्हाला 5000 रुपये देईल. प्रधानमंत्री जनकल्याण विभागामार्फत हे पैसे दिले जातील. 

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा मेसेज किती खरा आहे, खरंच लसीकरण करणाऱ्यांना सरकारकडून पैसे मिळणार का? याबाबत पीआयबीच्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती देण्यात आली आहे. पीआयबी फॅक्ट चेक ट्विटर अकाऊंटवर दिलेल्या माहितीनुसार हा मेसेज खोटा आहे. या मेसेजमध्ये काहीच तथ्य नाही आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा मेसेजपासून सावध राहा. य़ामध्ये फसवणूक होण्याची शक्यता आहे. असे मेसेज फॉरवर्ड करू नका. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

खोट्या बातम्या पसरण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न 

कोरोना काळात अनेक फेक मेसेज व्हायरल होत होते. PIB ने या काळात खोट्या बातम्या पसरण्यापासून रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले. PIB Fact Check सरकारच्या पॉलिसी/स्कीम्स/विभाग/मंत्रालयं यासंदर्भातील चुकीच्या सूचनांचा लोकांमध्ये प्रसार होऊ नये याकरता काम करते. सरकारसंबंधित कोणतीही बातमी खरी आहे की खोटी हे जाणून घेण्यासाठी तुम्ही PIB Fact Check ची मदत घेऊ शकता. कोणतीही व्यक्ती PIB Fact Check ला संशयास्पद बातमीचा किंवा पोस्टचा स्क्रीनशॉट, ट्वीट, किंवा फेसबुक पोस्ट 918799711259 या WhatsApp क्रमांकावर पाठवू शकता. त्याचप्रमाणे pibfactcheck@gmail.com या मेल आयडीवर मेल करून देखील तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता. 

Web Title: pib fact check viral message covid vaccine get 5k rupees central government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.