शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल टंचाई, त्यात हायवेवर अपघातग्रस्त टँकरमधून लीक झालं पेट्रोल, गोळा करण्यासाठी तुटून पडले लोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 14:28 IST

Uttar Pradesh News:

इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगासमोर इंधन टंचाईचं संकट आ वासून उभं आहे. भारतातही एलपीजी, पेट्रोल, डिझेलचा तुटवडा निर्माण होत असल्याच्या अफवा पसरल्याने गॅस एजन्सी तसेच पेट्रोल पंपांसमोर वाहनांच्या रांगा लागत आहेत. देशात पेट्रोल टंचाईचं चित्र निर्माण झालेलं दिसत असतानाच उत्तर प्रदेशमध्ये महामार्गावर एक धक्कादायक प्रकार घडला. महामार्गावर पेट्रोल घेऊन जाणाऱ्या एका टँकरला अपघात झाला. अपघातानंतर टँकरमधून पेट्रोलची गळती सुरू झाली. अपघातग्रस्त टँकरचा ड्रायवर मदतीसाठी हाका मारत होता. मात्र तिथे असलेले लोक त्याला मदत करण्याऐवजी बादल्या घेऊन पेट्रोल गोळा करण्यासाठी टँकरकडे धावले. त्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. तसेच वाहतुकीचीही कोंडी झाली.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार शुक्रवारी रात्री कानपूरमधील महामार्गावर काही बिघाड झाल्याने पेट्रोल वाहून नेणारा टँकर चालकाने रस्त्याच्या कडेला उभा केला होता. यादरम्यान, एका भरधाव वाहनाने टँकरला धडक दिली. त्यामुळे टँकरमधून पेट्रोलची गळती सुरू झाली. तसेच रस्त्यावर पेट्रोल पसरू लागले.

अपघातानंतर टँकर चालकाने स्थानिकांना मदतीची विनंती केली. मात्र आजूबाजूचे लोक त्याच्या मदतीसाठी न येता आजूबाजूच्या घरातून बादल्या आणि डबे घेऊन आले. तसेच टँकरमधून गळत असलेलं पेट्रोल गोळा करू लागले. सध्या पेट्रोलच्या टंचाईच्या बातम्या येत असल्याने हे पेट्रोल आपल्याला उपयुक्त ठरेल, असे या लोकांनी सांगितले. 

दरम्यान, वारंवार विनवण्या करूनही कुणी ऐकत नसल्याने अखेरीस ड्रायव्हरने पोलिसांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत पेट्रोल मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर सांडलं होतं. तसेच त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.  

English
हिंदी सारांश
Web Title : Fuel Tanker Accident: Locals Rush to Collect Spilled Petrol Amid Shortage

Web Summary : Amidst fuel shortage rumors, a tanker accident in Uttar Pradesh led to locals rushing to collect spilled petrol instead of helping the driver. Police and firefighters arrived to control the situation, averting a potential disaster as people prioritized personal gain over safety.
टॅग्स :Petrolपेट्रोलUttar Pradeshउत्तर प्रदेशAccidentअपघात