Today's Fuel Price : पेट्रोल 14 पैसे तर डिझेल 13 पैशांनी स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 13:00 IST2018-11-20T09:39:58+5:302018-11-20T13:00:30+5:30

Today's Fuel Price: गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. त्यानुसार आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. पेट्रोलचे दर 14 पैसे तर डिझेलचे दर 13 पैशांनी स्वस्त झाले आहेत.

Petrol price falls 14 paise in mumbai, diesel costs 13 paise less | Today's Fuel Price : पेट्रोल 14 पैसे तर डिझेल 13 पैशांनी स्वस्त

Today's Fuel Price : पेट्रोल 14 पैसे तर डिझेल 13 पैशांनी स्वस्त

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. मुंबईकरांना प्रति लिटर पेट्रोलसाठी 81.89 रुपये तर प्रति लिटर डिझेलसाठी 74.65 रुपये मोजावे लागणार आहेत.  राजधानी नवी दिल्लीतही पेट्रोल 14 पैशांनी तर डिझेल 12 पैशांनी स्वस्त झालं आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. त्यानुसार आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. पेट्रोलचे दर 14 पैसे तर डिझेलचे दर 13 पैशांनी स्वस्त झाले आहेत. कपात करण्यात आलेल्या किंमतीनुसार मुंबईकरांना प्रति लिटर पेट्रोलसाठी 81.89 रुपये तर प्रति लिटर डिझेलसाठी 74.65 रुपये मोजावे लागणार आहेत.  

राजधानी नवी दिल्लीतही पेट्रोल 14 पैशांनी तर डिझेल 12 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे राजधानीत प्रति लिटर पेट्रोलसाठी 76.38 रुपये, तर प्रति लिटर डिझेलसाठी 71.27 रुपये मोजावे लागणार आहेत.

(सौजन्य : पेट्रोल डिझेल प्राईज डॉट कॉम -  मुंबई)

मागील दोन आठवड्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं घट होत आहे. इंधनाची किंमत डॉलरचा दर व आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे भाव यावर निश्चित होते. दोन महिन्यांपासून कच्चे तेल महाग झाले होते. पण आता ते काही प्रमाणात स्वस्त झालं आहे. 6 ऑक्टोबरला पाच राज्यांमधील निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. निवडणुकांचा प्रचार ऐन रंगात असतानाच, तेल कंपन्यांनी 18 ऑक्टोबरपासून पेट्रोल-डिझेलची दरकपात सुरू केली आहे. यावरून सरकारी तेल कंपन्यांची निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून दरकपात केल्याचे दिसून येत आहे. निवडणुका संपताच डिसेंबरात इंधनाचे दर भडकण्याची भीती आहे.

(सौजन्य : पेट्रोल डिझेल प्राईज डॉट कॉम -  दिल्ली)

Web Title: Petrol price falls 14 paise in mumbai, diesel costs 13 paise less