शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बागेत बहरला बारमाही आंबा ! आंबे लगडले : नागरिकांतून कुतूहल अन् आश्चर्यही

By admin | Updated: December 15, 2014 00:43 IST

लातूर : अगोदरच शहरात जागेची कमतरता. त्यातही सोन्याचा भाव जागेला असल्याने अनेकदा घरासमोर इंचभरही जागा व्यर्थ जाणार नाही, याची काळजी बांधकाम सुरू असतानाच घेतली जाते. काही तुरळक ठिकाणीच घराला लागून बगिचे केले जातात. लातुरातील बोधे नगर भागात एका प्राध्यापकाच्या घरी बारमाही आंबा बहरला आहे. सध्या या आंब्याच्या झाडाला मोहोरही बहरला असून, आंबेही लगडली आहेत. त्यामुळे रस्त्याने येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांतून कुतूहल व्यक्त होत आहे.

लातूर : अगोदरच शहरात जागेची कमतरता. त्यातही सोन्याचा भाव जागेला असल्याने अनेकदा घरासमोर इंचभरही जागा व्यर्थ जाणार नाही, याची काळजी बांधकाम सुरू असतानाच घेतली जाते. काही तुरळक ठिकाणीच घराला लागून बगिचे केले जातात. लातुरातील बोधे नगर भागात एका प्राध्यापकाच्या घरी बारमाही आंबा बहरला आहे. सध्या या आंब्याच्या झाडाला मोहोरही बहरला असून, आंबेही लगडली आहेत. त्यामुळे रस्त्याने येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांतून कुतूहल व्यक्त होत आहे. लातूर शहरातील बोधे नगर हा भाग नेहमीच गर्दीने फुललेला. परिसरात मोठ मोठ्या इमारतीही आहेत. रहिवाशांची संख्या अधिक असल्याने फारशी मोकळी जागा दिसून येत नाही. या ठिकाणी बोरी येथील कमला नेहरू उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपप्राचार्य बस्वराज करकेली यांचे निवासस्थान आहे. त्यांनी घरासमोरच जवळपास १५ बाय २० च्या जागेत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली आहे. त्यात पाच वर्षांपूर्वी एक आंब्याचे कलम त्यांनी लावले. सध्या आंब्याचे झाड मोठे झाले आहे. या आंब्याच्या झाडाला बारमाही मोहोर लागत आहे. त्याचबरोबर आंबेही लगडून गेली आहेत. जसजसे आंबे मोठे होतात, तसतसा झाडाला मोहोरही त्याच्या पटीत लागतो. हिवाळ्यात आंब्याचे उत्पादन सहसा कोठेही आढळून येत नाही. क्वचित ठिकाणी किरकोळ प्रमाणात आंबे लगडलेले असतात. इथे मात्र प्रा. करकेली यांच्या दारात बारा महिने आलेल्या पाहुण्यांना आंब्याचे दर्शन होते. कुतूहलाने अनेकजण झाडाच्या लागवडीपासून ते फळ लागेपर्यंतच्या मशागतीची चौकशीही करतात. कोठून तरी आणून लावलेले हे कलमाचे रोपटे आता वृक्ष झाले आहे. कलमी (तोतापुरी) आंब्याप्रमाणे ३०० ग्रॅमपेक्षा अधिक वजन असलेले आंबे सध्या झाडाला लगडले आहेत. दारासमोरच झाड असल्याने रस्त्याने येणारे-जाणारे लोक कुतूहलाने झाडाची पाहणी करतात. आंब्यामुळे वाढली मैत्री... दारातच आंब्याचे मोठे वृक्ष आहे. रस्त्याने येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांच्या नजरेस आंबे पडतात. मोहोरही बहरल्याचे ठळकपणे दिसते. त्यामुळे काहीजण जाणीवपूर्वक दारात उभे राहून चौकशी करतात. घरात कोणी नसेल तर लहान मुले कुतूहलाने आंबे तोडून घेऊन जातात. अनोळखी लोकांकडून विचारपूस होत असल्याने नव्याने ओळखी वाढल्या आहेत. विचारपूस वाढल्याने नवे मित्रही जोडले गेले असल्याचे प्रा. बस्वराज करकेली यांनी सांगितले.