"कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर बेफिकीर होती जनता आणि सरकार; आता पॉझिटिव्ह राहावं लागेल"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 08:19 PM2021-05-15T20:19:11+5:302021-05-15T20:22:04+5:30

Mohan bhagwat : नियमांचे पालन करून आपण समाजसेवा केली, तर आपण पुढे जात राहू. इतक्या वर्षांत इतक्या भयानक संकटात आपला देश अढळ राहिला, असे मोहन भागवत म्हणाले.

People, Government Became Negligent After First Covid Wave: RSS Chief Mohan bhagwat | "कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर बेफिकीर होती जनता आणि सरकार; आता पॉझिटिव्ह राहावं लागेल"

"कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर बेफिकीर होती जनता आणि सरकार; आता पॉझिटिव्ह राहावं लागेल"

Next
ठळक मुद्दे'पॉझिटिव्ह अनलिमिटेड' या कार्यक्रमाला मोहन भागवत संबोधित करत होते.

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची होणारी वाढ आणि यामुळे होणाऱ्या मृतांची संख्या पाहता चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कोरोनासंदर्भात जनतेला आवाहन केले आहे. तसेच, कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर जनता आणि सरकार बेफिकिर राहिले. आता आपल्याला पॉझिटिव्ह राहूनच या संकटाचा मुकाबला करायला पाहिजे, असे मोहन भागवत यांनी सांगितले. ( People, Government Became Negligent After First Covid Wave: RSS Chief Mohan bhagwat address Positivity Unlimited Program)

'पॉझिटिव्ह अनलिमिटेड' या कार्यक्रमाला मोहन भागवत संबोधित करत होते. पहिल्या लाटेनंतर सरकार आणि जनता बेफिकीर झाली होती. आता आपल्याला पॉझिटिव्ह राहावे लागेल. स्वत: कोविड निगेटिव्ह ठेवण्यासाठी सावधान राहावे लागणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता तर्कहिन वक्तव्येही टाळावी लागणार आहेत. ही परीक्षेची वेळ आहे. मात्र, सर्वांना एकजूट राहावे लागेल. एक टीम म्हणून काम करावे लागेल, असे मोहन भागवत यांनी सांगितले. 


याचबरोबर, कोरोना संकटात यश आणि अपयश येणे हे अंतिम नाही. आपल्याला प्रयत्न सुरूच ठेवावे लागतील. सध्या आपल्याला या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. कारण, कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर सरकार, प्रशासन आणि जनता बेफिकीर झाले होते. आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, घाबरून जाऊ नका. तर स्वत:ला तयार करण्याची गरज आहे, असे मोहन भागवत म्हणाले.

(Narendra Modi : केंद्राकडून राज्यांना दिलेल्या व्हेंटिलेटरर्सचे ऑडिट करा, पंतप्रधानांचे आदेश)

याशिवाय, काही लोक घाबरून अनावश्यक रुग्णालयात दाखल होतात. परिणामी खरी गरज ज्यांना असते, त्यांना बेड मिळत नाही. त्यामुळे लक्षणे जाणवू लागताच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यानुसार लागलीच पावले उचला आणि उपचार सुरू करा. नियमांचे पालन करून आपण समाजसेवा केली, तर आपण पुढे जात राहू. इतक्या वर्षांत इतक्या भयानक संकटात आपला देश अढळ राहिला, असे मोहन भागवत म्हणाले.

या जागतिक संकटासमोर कठीण संघर्ष होईल. पण तो आपण जिंकू, आपण जिंकायलाच हवा. ही परिस्थिती आपल्यातले दोष दाखवेल. दोष दूर करून सद्गुणांना वाढवून ही परिस्थिती आपल्याला शिकवेल. ही आपल्या धैर्याची परीक्षा आहे. यश-अपयशाचा खेळ चालतच राहणार. सतत लढत राहण्याची हिंमत महत्त्वाची आहे. प्रयत्न करत राहा, निराश होण्याचे कारण नाही, अशा शब्दांत मोहन भागवत यांनी लोकांना आवाहन केले आहे.

(CoronaVirus : कोरोनाच्या B1.617.2 व्हेरिएंटवर लस प्रभावी नाही, UK एक्सपर्टचा दावा)

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: People, Government Became Negligent After First Covid Wave: RSS Chief Mohan bhagwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app