CoronaVirus : कोरोनाच्या B1.617.2 व्हेरिएंटवर लस प्रभावी नाही, UK एक्सपर्टचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 07:32 PM2021-05-15T19:32:42+5:302021-05-15T19:36:44+5:30

CoronaVirus : कोरोनाचा B1.617.2 व्हेरिएंट पहिल्यांदाच भारतात आढळला आणि काही लोक त्याला भारतीय व्हेरिएंट म्हणत आहेत.

corona vaccines almost certainly less effective against indian covid variant b1 617 2 transmission uk expert | CoronaVirus : कोरोनाच्या B1.617.2 व्हेरिएंटवर लस प्रभावी नाही, UK एक्सपर्टचा दावा

CoronaVirus : कोरोनाच्या B1.617.2 व्हेरिएंटवर लस प्रभावी नाही, UK एक्सपर्टचा दावा

Next
ठळक मुद्देब्रिटनमध्ये एका आठवड्यातच कोरोनाचा B1.617.2 व्हेरिएंट असलेल्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे.

 नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये कोरोनापासून बचाव करण्यासाठी टोचण्यात येणार लस कोरोना व्हायरसच्या B1.617.2 व्हेरिएंटचा प्रादुर्भाव रोखण्यास कमी प्रभावी आहे, असा दावा ब्रिटनमधील तज्ज्ञांनी केला आहे. ब्रिटनमधील लसीकरण कार्यक्रमाचा एक भाग असलेल्या या तज्ज्ञांनी शनिवारी हा दावा केला आहे. दरम्यान, कोरोनाचा B1.617.2 व्हेरिएंट पहिल्यांदाच भारतात आढळला आणि काही लोक त्याला भारतीय व्हेरिएंट म्हणत आहेत. (corona vaccines almost certainly less effective against indian covid variant b1 617 2 transmission uk expert)

वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, ब्रिटनमध्ये एका आठवड्यातच कोरोनाचा B1.617.2 व्हेरिएंट असलेल्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. अशा परिस्थितीत देशातील ज्या भागांमध्ये व्हायरचा हा व्हेरिएंट वेगाने पसरू लागला आहे, याठिकाणी तपासणी आणि लसीकरण वेगाने केले जात आहे. दरम्यान, B1.617.2 व्हेरिएंट पहिल्यांदा महाराष्ट्रात आढळला होता.

(Narendra Modi : केंद्राकडून राज्यांना दिलेल्या व्हेंटिलेटरर्सचे ऑडिट करा, पंतप्रधानांचे आदेश)

ब्रिटनमध्ये पसरलेल्या कोरोनाच्या व्हेरिएंटबाबत ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर एंथनी हार्डेन म्हणाले की, यामुळे देश अनलॉक करण्याच्या योजनेत अडथळे निर्माण होऊ शकतात कारण कोरोनाचा हा व्हेरिएंट किती वेगाने प्रादुर्भाव होईल हे अद्याप स्पष्ट झाले नाही. लस नवीन व्हेरिएंटच्या विरोधात कमी प्रभावी असू शकते असा दावाही त्यांनी केला.

याआधी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन म्हणाले की, नवीन व्हेरिएंट दुसऱ्या व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक प्रादुर्भाव काय आहे, हे सांगणऱ्या आकडेवारीची वाट पाहत आहे. दुसरीकडे, ब्रिटनच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, B1.617.2 व्हेरिएंटचा प्रादुर्भाव उत्तर-पश्चिन इंग्लंड आणि लंडनमध्ये आहे.

(Spicejet च्या वैमानिकांना क्रोएशियामध्ये विमानातच घालवावे लागले 21 तास, कारण...)

दरम्यान, ब्रिटनने आता कोविशिल्डचे दोन्ही डोस देण्यातील वेळ कमी केला आहे. आता दोन डोसमधील अंतर 8 आठवडे बनले आहे. मात्र, हा नियम केवळ 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लागू केला गेला आहे. याआधी, त्यांच्यासाठी दोन डोसमधील अंतर 12 आठवड्यांचे होते. 

(डॉक्टर म्हणाले, 'मी माघार घेऊ शकत नाही, मला देशाला वाचवायचे आहे', तीन दिवसानंतर मृत्यू)

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: corona vaccines almost certainly less effective against indian covid variant b1 617 2 transmission uk expert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app