शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

VIDEO: ...अन् सर्वसामान्यांनी बघता बघता फेरीवाल्याचे ३० हजारांचे आंबे लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 21:26 IST

विक्रेत्याच्या अहायतेचा सामान्यांकडून गैरफायदा; ३० हजारांच्या आंब्यांची लूट

नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून देशात लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका हातावर पोट असलेल्या मजुरांना आणि कामगारांना बसला आहे. रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या फेरीवाल्यांचेही लॉकडाऊनमुळे हाल झाले. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात रस्त्यावर विक्री करण्यास काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. मात्र त्यातही काही ठिकाणी सर्वसामान्य व्यक्ती विक्रेत्यांना लुटत असल्याच्या घटना घडत आहेत. आज सकाळी दिल्लीत असाच प्रकार घडला. दिल्लीच्या जगतपुरी भागात छोटे नावाचा एक जण आंबे विकत होता. आंबे जास्त असल्यामुळे त्यानं काही पेट्या रस्त्याच्या कडेला ठेवल्या होत्या. जवळच वाद झाल्यानं काही जण आले आणि त्यांना छोटेला त्याची आंब्यांची गाडी पुढे नेण्यास सांगितली. छोटे काही अंतर पुढे गेला. आंब्यांच्या पेट्यांजवळ विक्रेता नसल्याचं पाहत रस्त्यावरुन जाणारे अनेकजण धावत पेट्यांजवळ आले. त्यांनी शक्य तितके आंबे हातात घेतले. काहींनी आंबे खिशात, पिशवीत भरले आणि तिथून निसटले. काहींनी तर रिक्षा, सायकल, दुचाकीवरुन उतरून आंबे पळवले.  या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात सर्वसामान्यांकडून सुरू असणारी आंब्यांची लूट अगदी स्पष्टपणे दिसत आहे. मी जवळपास १५ पेट्या आंबे आणले होते. त्यांच्या खरेदीसाठी ३० हजार मोजले होते. आंब्यांच्या पेट्यांपासून थोडं दूर जाताच आसपास असलेल्या अनेकांनी आंबे चोरले, असं छोटूनं सांगितलं. छोटेनं याबद्दल पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्याप या प्रकरणी कोणतीही कारवाई झालेली नाही.अभिमानास्पद! आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी स्वीकारलं WHOच्या कार्यकारी मंडळाचं अध्यक्षपदलाहोरहून कराचीला जाणाऱ्या पाकिस्तान एअरलाईन्सच्या विमानाला भीषण अपघातपंतप्रधान मोदींकडून केवळ 1 हजार कोटींची मदत जाहीर; ममता बॅनर्जींची टीका"केंद्राने ४६८ कोटी दिले, पण ठाकरे सरकार एक दमडीचंही पॅकेज द्यायला तयार नाही"भाजपाच्या आंदोलनाला एकनाथ खडसेंनी असा दिला प्रतिसाद....