अभिमानास्पद! आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी स्वीकारलं WHOच्या कार्यकारी मंडळाचं अध्यक्षपद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 11:02 AM2020-05-20T11:02:17+5:302020-05-22T20:39:25+5:30

कोरोनाविरोधातील लढाईत भारत जगातील अनेक देशांसाठी देवदूत ठरला आहे. कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात इतर देशांच्या तुलनेत भारत यशस्वी झाला आहे.

health minister harsh vardhan set to be who executive board chairman SSS | अभिमानास्पद! आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी स्वीकारलं WHOच्या कार्यकारी मंडळाचं अध्यक्षपद

अभिमानास्पद! आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी स्वीकारलं WHOच्या कार्यकारी मंडळाचं अध्यक्षपद

googlenewsNext

नवी दिल्ली - जगभरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा तीन लाखांच्या वर पोहोचला आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही अमेरिकेतील रुग्णांची आहे. कोरोना व्हायरसमुळे इटली, स्पेन, अमेरिका आणि युरोपमध्ये गंभीर परिस्थिती ओढवली आहे. भारतातही कोरोनाबाधितांचा आकडा एक लाखांच्या वर पोहोचला आहे. तर 3000 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाविरोधातील लढाईत भारत जगातील अनेक देशांसाठी देवदूत ठरला आहे. कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात इतर देशांच्या तुलनेत भारत यशस्वी झाला आहे. 

कोरोनाच्या लढ्यात भारताने केलेल्या कामाचं आणि उपाययोजनांचं कौतुक जागतिक स्तरावर केलं जात आहे. याच दरम्यान भारतासाठी एक अभिमानाची बाब समोर आली. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची जागतिक आरोग्य संघटनेच्या 34 सदस्यीय कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. डॉ. हर्षवर्धन यांनी आज पदभार स्वीकारला. याआधी जपानचे डॉ. हिरोकी नकातानी यांच्याकडे या पदाची जबाबदारी होती. 'कोरोनामुळे जागतिक संकट निर्माण झालं असताना मी हे पद स्वीकारत आहे. पुढील २ दशकं आरोग्याशी संबंधित अनेक आव्हानं आपल्या समोर येणार आहेत. या आव्हानांचा सामना करण्यासाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत, असं मत त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर व्यक्त केलं. 

भारताला कार्यकारी मंडळात सहभागी करण्यावर मंगळवारी एकमत झालं आहे. 194 देशांनी या प्रस्तावावर स्वाक्षऱ्याही केल्या असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. तसेच तीन वर्षांसाठी कार्यकारी मंडळावर भारताची नियुक्ती केली जाईल असा निर्णय मागील वर्षी जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशिया समुहानं सर्वांच्या संमतीने घेतला होता. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षवर्धन यांची निवड 22 मे रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत होईल. क्षेत्रीय गटांमध्ये अध्यक्ष पद एक वर्षासाठी दिलं जातं. गेल्या वर्षी हे ठरवण्यात आलं होतं. येत्या शुक्रवारपासून यातील पहिलं वर्ष सुरू होणार असून यासाठी भारताचा प्रतिनिधी कार्यकारी मंडळाचा अध्यक्ष असणार आहे. या कार्यकाळी मंडळाच्या वर्षातून दोन बैठका होतात आणि यापैकी जानेवारी महिन्यात मुख्य बैठक होते. आरोग्य सभेनंतर त्वरीत मे महिन्यात या मंडळाची एक बैठक आयोजित करण्यात येते. आरोग्य सभेच्या सर्व निर्णयांना आणि धोरणांना प्रभावी बनवण्यासाठी योग्य सल्ला देण्याची जबाबदारी कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षांकडे असते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : सरकारच्या 'या' योजनेचा 1 कोटी गरिबांना मिळाला आधार; मोदी म्हणाले...

CoronaVirus News : काय सांगता? संगीत ऐकून कोरोनाग्रस्त बरे होणार; 'ही' थेरेपी फायदेशीर ठरणार

CoronaVirus News : बापरे! मास्क न लावल्यास अटक होणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय

CoronaVirus News : धक्कादायक! लॉकडाऊननंतर चिमुकल्यांची होईल भयानक अवस्था?; नोबेल विजेते म्हणतात...

CoronaVirus News : "सरकारचा 'हा' निर्णय दिल्लीकरांसाठी डेट वॉरंट ठरू शकतो"

CoronaVirus News : ...अन् पंतप्रधान येताच डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी केलं असं काही; Video व्हायरल

Lockdown 4.0 : प्रवासासाठी ई-पास काढायचाय?; धावाधाव नको, केंद्राची 'ही' वेबसाईट करेल मदत

Web Title: health minister harsh vardhan set to be who executive board chairman SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.