पंतप्रधान मोदींकडून केवळ 1 हजार कोटींची मदत जाहीर; ममता बॅनर्जींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 02:36 PM2020-05-22T14:36:17+5:302020-05-22T14:45:53+5:30

घोषणेमधील कोणतीही माहिती आपल्याला दिलेली नसल्याचा आरोप ममता यांनी केला. ही रक्कम कधी मिळेल, ही रक्कम सुरुवातीची आहे का, याबाबत काहीही माहिती नाही.

PM Narendra Modi announced 1000 crore Amfan releaf; Mamata banergy gets angry hrb | पंतप्रधान मोदींकडून केवळ 1 हजार कोटींची मदत जाहीर; ममता बॅनर्जींची टीका

पंतप्रधान मोदींकडून केवळ 1 हजार कोटींची मदत जाहीर; ममता बॅनर्जींची टीका

googlenewsNext

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अम्फान चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये झालेल्या नुकसानीची हवाई पाहणी केली. तसेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत चर्चा केली. यानंतर त्यांनी नुकसानग्रस्तांना १ हजार कोटींची मदत जाहीर केली. यावर ममता बॅनर्जी कमालीच्या संतप्त झाल्या आणि जोरदार टीका केली आहे. 


मोदी यांच्या या घोषणेवर ममता यांनी पश्चिम बंगालचे १ लाख कोटींचे नुकसान झाल्याचे सांगत पंतप्रधानांनी केवळ १ हजार कोटी देण्याची घोषणा केल्याचे म्हटले आहे. तसेच या घोषणेमधील कोणतीही माहिती आपल्याला दिलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला. ही रक्कम कधी मिळेल, ही रक्कम सुरुवातीची आहे का, याबाबत काहीही माहिती नाही. अम्फान वादळामुळे आमचे १ लाख कोटींचे नुकसान झाले आहे. उलट आमचेच केंद्राकडे ५३ हजार कोटी रुपये थकलेले आहेत, अशी टीका ममता यांनी केली. 




दरम्यान, ममता यांनी राज्यात चक्रीवादळामुळे ८० मृत्यू झाल्याचे सांगितले. तसेच त्यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याचे आवाहन केले होते. यानुसार मोदी यांनी लगेचच ट्वीट करत शुक्रवारी येत असल्याचे सांगितले. या प्रमाणे आज त्यांनी पश्चिम बंगालचा दौरा केला. 




यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, चक्रीवादळामुळे कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने प्रयत्न केले. तरीही आम्ही ८० जणांना वाचवू शकलो नाही. याचे दु:ख आहे. शेती, वीज आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. आता आम्हाला त्यांची मदत करायची आहे. दोन्ही सरकारे मिळून मदत करणार असल्याचे मोदी म्हणाले. 



 



 

अन्य महत्वाच्या बातम्या....

कोरोनाच्या संकटात 5G ची पेरणी; Oppo Find X2 Neo स्मार्टफोन लाँच

देशाचा जीडीपी शुन्याखाली जाण्याची शक्यता; आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा अंदाज

CoronaVirus कोरोनाची मजल पुढच्या सूर्य ग्रहणापर्यंतच; काशीच्या ज्योतिषाचार्यांचे मोठे संकेत

कर्जदारांना मोठा दिलासा; EMI वर आरबीआयचा निर्णय

खूशखबर! महागाई रोखण्यासाठी रेपो रेटमध्ये कपात; रिझर्व्ह बँकेचा कर्जदारांना मोठा दिलासा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८३ दिवसांनी दिल्ली सोडली; ओडिशा, पश्चिम बंगालचा पाहणी दौरा

चीनची एकी! स्पर्धक असुनही शाओमी, ओप्पो, वनप्लस, व्हिवो आले एकत्र

Read in English

Web Title: PM Narendra Modi announced 1000 crore Amfan releaf; Mamata banergy gets angry hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.