शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

‘पिपली लाईव्ह’चा सह-दिग्दर्शक बलात्कार प्रकरणी दोषी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2016 19:20 IST

अमेरिकन महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी साकेत न्यायालयाने ‘पिपली लाईव्ह’चा सह-दिग्दर्शक महमूद फारुकीला दोषी ठरवलं आहे. २ आॅगस्ट रोजी न्यायालय महमूद ...

अमेरिकन महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी साकेत न्यायालयाने ‘पिपली लाईव्ह’चा सह-दिग्दर्शक महमूद फारुकीला दोषी ठरवलं आहे. २ आॅगस्ट रोजी न्यायालय महमूद फारुकीला शिक्षा सुनावणार आहे. महमूद फारुकी जामीनावर बाहेर आहे. मात्र न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर त्याला पुन्हा अटक करण्यात आलं आहे.  महमूद फारूकीला २०१५ मध्ये बलात्काराच्या आरोपात अटक करण्यात आली होती. नवी दिल्ली न्यू फ्रेंडस कॉलीनीत पोलीस ठाण्यामध्ये एका अमेरिकन महिलेने महमूद फारूकीविरोधात तक्रार नोंदविली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी फारुकीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत अटक केली होती. मार्च २०१५ मध्ये फारुकीने बलात्कार केल्याचे पिडीत महिलेने तक्रारीत म्हटले होते. २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पिपली लाईव्ह’ या चित्रपटाचे फारुकी याने सह दिग्दर्शन व लेखन केले होते. तक्रार केलेली 35 वर्षीय अमेरिकन महिला कोलंबिया विद्यापीठाची विद्यार्थिनी होती. रिसर्चसाठी ती भारतात आली होती. यावेळी महमूद फारूकीने बलात्कार केल्याची तक्रार महिलेने केली होती. न्यायालयातही महिला आपल्या तक्रारीवर ठाम होती. महमूद फारूकीने माफी मागत आपल्याला अनेक ई-मेल्स पाठवले होते अशी माहिती महिलेने न्यायालयात दिली होती. फारुकीने मात्र सर्व आरोप फेटाळत आपल्याला फसवण्यात आल्याचा दावा केला होता. दिल्ली पोलिसांनी 29 जून रोजी पहिलं आरोपपत्र दाखल केलं होतं. त्यानुसार 28 मार्च रोजी महमूद फारूकीने आपल्या सुखदेव विहारमधील निवासस्थानी महिलेवर बलात्कार केल्याची माहिती दिली होती. महमूद फारूकीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप पोलिसांकडून करण्यात आला होता.