शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीचे भविष्य पवार-सोनिया भेटीवर

By admin | Updated: September 7, 2014 02:00 IST

महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीवरील संकटाचे ढग अजूनही दूर झालेले नाहीत.

शीलेश शर्मा - नवी दिल्ली 
महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीवरील संकटाचे ढग अजूनही दूर झालेले नाहीत. आघाडी करून निवडणूक लढण्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विरोध करीत आहेत, तर पक्षातील इतर वरिष्ठ नेते अनेक विरोधाभास असूनही एकत्रपणो निवडणुकीत उतरण्याच्या बाजूचे आहेत, असे पक्षाच्या उच्चपदस्थ सूत्रंनी सांगितले.
काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने असे संकेत दिले की, आघाडीच्या जागावाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद कायम आहेत. त्यामुळे काँग्रेस एकटय़ाने निवडणूक लढविणार की, एक पाऊल पुढे, एक पाऊल मागे टाकण्याचा पवित्र घेत राष्ट्रवादीशी समझोता करेल, याचा निश्चित निर्णय अद्याप होऊ शकलेला नाही. समझोता करायचा झाल्यास गेल्या निवडणुकीच्या तुलनेत राष्ट्रवादीला काही जास्त जागा देण्याचा व काही जागांची अदलाबदल करण्याचा प्रस्ताव काँग्रेसकडून दिला जाऊ शकेल. मात्र राष्ट्रवादीची निम्म्या जागांची मागणी मान्य करणो शक्य नसल्याचे या नेत्याने सांगितले.
काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीत या तिढय़ातून काही मार्ग निघाला नाही, तर काँग्रेस आघाडी न करता एकटी निवडणूक लढवील, असेही संकेत पक्षातून मिळत आहेत. असे असले तरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीशी संपर्क ठेवून आहेत. 
शक्यतो आघाडी टिकून राहावी यासाठी अहमद पटेल सोनिया गांधी यांच्या निर्देशांनुसार प्रयत्न करीत असल्याचा दावाही सूत्रंनी केला. सूत्रंनुसार अहमद पटेल सोनिया गांधी व शरद पवार यांच्यातील या मुद्दय़ावर होणा:या संभाव्य भेटीसाठी पृष्ठभूमी तयार करीत आहेत. मात्र ही भेट कधी होईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
2क्क्9च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 17क् तर राष्ट्रवादीने 113 मतदारसंघांत निवडणूक लढविली होती.
 
शुक्रवारी सायंकाळी उशिरा काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली, पण आघाडीच्या या अनिश्चितीमुळे उमेदवारांच्या नावांवर कोणताही निर्णय होऊ शकला नाही. लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकाजरुन खार्गे यांच्या अध्यक्षतेखालील छाननी समितीने काँग्रेसच्या महाराष्ट्रातील 122 उमेदवारांची यादी तयार केली आहे व त्यावर पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीचे शिक्कामोर्तब व्हायचे बाकी आहे. पण आघाडी होणार की नाही हे जोर्पयत स्पष्ट होत नाही तोर्पयत याचा अंतिम निर्णय घेणो शक्य नाही, याकडे पक्षाच्या सूत्रंनी लक्ष वेधले.