शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

'मोदींचा (Modi) अर्थ' मसूद, ओसामा, दाऊद, आयएसआय, काँग्रेस प्रवक्त्यांचे वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 12:07 PM

काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी एका वृत्तवाहिनीच्या चर्चेदरम्यान मोदीं (Modi) चा अर्थ मसूद, ओसामा, दाऊद, आयएसआय असा असल्याचे वादग्रस्त विधान केले आहे

ठळक मुद्देकाँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी एका वृत्तवाहिनीच्या चर्चेदरम्यान मोदीं (Modi) चा अर्थ मसूद, ओसामा, दाऊद, आयएसआय असा असल्याचे वादग्रस्त विधान केले आहे. पवन खेडा यांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पवन खेडा यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ भाजपाने पोस्ट केला आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी एका वृत्तवाहिनीच्या चर्चेदरम्यान मोदीं (Modi) चा अर्थ मसूद, ओसामा, दाऊद, आयएसआय असा असल्याचे वादग्रस्त विधान केले आहे. पवन खेडा यांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपाने आपल्या अधिकृत ट्विटरवर मोदींबद्दल केलेल्या विधानाचा मुद्दा उचलत ट्वीट केले आहे. पवन खेडा यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ भाजपाने पोस्ट केला आहे.

MODI यांचा अर्थ मसूद अजहर, ओसामा, दाऊद आणि आयएसआय असा आहे असं एका वृत्तवाहिनीच्या चर्चेदरम्यान पवन खेडा यांनी म्हटलं आहे. भाजपाकडून पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा देखील चर्चेत सामील झाले होते. 'देशाच्या पंतप्रधानांची तुलना तुम्ही ओसामा बिन लादेनसोबत कशी करू शकता? असा प्रश्न उपस्थित करत पवन खेडा यांनी माफी मागावी' अशी मागणी संबित पात्रा यांनी केली आहे. पवन खेडा यांच्या वादग्रस्त विधानावर नेटीझन्सनी नाराजी व्यक्त केली आहे. 

'काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी मोदी यांचा अर्थ मसूद, ओसामा, दाऊद, आयएसआय असा सांगितला आहे. आपल्याजवळ काँग्रेस असताना पाकिस्तानसारख्या दुश्मनाची गरज काय आहे?' असं भाजपाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. पवन खेडा यांचे हे वादग्रस्त विधान काँग्रेस पक्षासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. 

रोजगारनिर्मितीतील अपयश दडवण्याचा मोदींचा प्रयत्न- राहुल गांधी

रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध करून देण्यात आलेले घोर अपयश पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांपासून दडवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला होता.राष्ट्रीय ठोकळ उत्पन्नाच्या आकडेवारीची फेरमांडणी व राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय (एनएसएसओ)ची रोजगारासंदर्भातील आकडेवारी खुली न करणे या केंद्र सरकारच्या धोरणाबद्दल जगभरातील १०८ अर्थतज्ज्ञ व समाजशास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली होती. त्यामध्ये राकेश बसंत, जेम्स बॉईस, एमिली ब्रेझा, सतीश देशपांडे, पॅट्रिक फ्रँकोइस, आर. रामकुमार, हेमा स्वामीनाथन, रोहित आझाद आदींचा समावेश आहे. देशातील संस्थांचे स्वातंत्र्य तसे सांख्यिकी संस्थांची प्रतिष्ठा जपली जावी, असे आवाहन या नामवंतांनी केंद्र सरकारला केले होते. या अनुषंगाने राहुल गांधी यांनी सरकारला धारेवर धरले होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाmasood azharमसूद अजहरISIआयएसआयOsama Bin Ladenओसामा बिन लादेनDawood Ibrahimदाऊद इब्राहिम