शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2024 7:37 PM

1 / 8
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा सध्या आयपीएलमध्ये व्यग्र आहे. आयपीएलचा सतरावा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे.
2 / 8
जड्डू चांगल्या फॉर्ममध्ये असून, ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने भारतासाठी ही आनंदाची बातमी आहे. जड्डू आयपीएलमध्ये तर त्याची पत्नी रिवाबा जडेजा निवडणुकीत व्यग्र आहे.
3 / 8
रिवाबा जडेजा ही भाजपाच्या तिकिटावर विधानसभेला निवडून आली. ती जामनगर उत्तर येथून आमदार बनली. ती सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र आहे.
4 / 8
रिवाबा अनेक सभांना उपस्थित राहत आहे. अलीकडेच ती पंतप्रधान नरेंद्र मोदींसह स्टेज शेअर करताना दिसली होती.
5 / 8
गुजरातच्या सर्व जागांसाठी तिसऱ्या टप्प्यात सात तारखेला मतदान होणार आहे. सूरतच्या जागेचा अपवाद वगळता २५ जागांसाठी मतदान होईल.
6 / 8
पंतप्रधान मोदींनी बुधवारी गुजरातमधील बनासकांठा येथील सभेत बोलताना विजयाचा विश्वास व्यक्त केला. यावेळी रिवाबाचाही सहभाग होता. ५ सप्टेंबर १९९० रोजी जन्मलेली रिवाबा तिच्या साधेपणामुळे चर्चेत असते.
7 / 8
रिवाबाचा पती रवींद्र जडेजाचा जन्म ६ डिसेंबर १९८८ मध्ये गुजरातच्या जामनगर येथील नवागाम गड सिटी येथील गुजराती राजपूत कुटुंबात झाला. रवींद्रने भारतीय सैन्यात जावे अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती, परंतु त्याने क्रिकेटपटू होण्याचा निर्णय घेतला.
8 / 8
२००५ मध्ये रवींद्रची आई लता यांचा अपघातात मृत्यू झाला आणि त्यावेळी रवींद्रने क्रिकेट सोडण्याचा निर्णय जवळपास घेतला होता. २०१६ मध्ये रवींद्र आणि रिवाबा यांचे लग्न झाले. त्यांना एक मुलगी असून तिचे नाव निध्याना असे आहे.
टॅग्स :ravindra jadejaरवींद्र जडेजाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४GujaratगुजरातBJPभाजपा