पैसाच पैसा! कारमध्ये सापडले नोटांचे बंडल; मोजण्यासाठी मागवली मशीन, काय आहे हे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 11:01 IST2024-12-24T11:00:44+5:302024-12-24T11:01:26+5:30
पाटणा येथे पोलिसांना सोमवारी रात्री एका कारमध्ये तब्बल ७० लाख रुपये सापडले. नोटांचे बंडल पाहून पाटणा पोलिसांना धक्काच बसला.

फोटो - ABP News
पाटणा येथे पोलिसांना सोमवारी रात्री एका कारमध्ये तब्बल ७० लाख रुपये सापडले. नोटांचे बंडल पाहून पाटणा पोलिसांना धक्काच बसला. इन्कम टॅक्स गोलांबरजवळ वाहन तपासणी मोहिमेदरम्यान पोलिसांनी कारची झडती घेतली असता नोटांचे बंडल सापडले. त्यानंतर मशीन वापरून पैसे मोजले असता जवळपास ७० लाख रुपये असल्याचं आढळून आलं. ही घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
वाहन तपासणीदरम्यान एवढी रक्कम आढळून आल्यावर पोलिसांनी आयकर विभागालाही याबाबत माहिती दिली. ज्या व्यक्तीकडे हे पैसे सापडले तो व्यापारी असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, पोलीस आणि आयकर विभागाच्या पथकांनी तपास सुरू केला आहे. आयकर विभागाची टीम चौकशी करत असून त्यानंतरच हे प्रकरण स्पष्ट होईल.
या संपूर्ण प्रकरणात कोतवालीचे डीएसपी कृष्णा मुरारी प्रसाद म्हणाले की, गुन्हे नियंत्रणासाठी पोलीस मुख्यालयाच्या सूचनेनुसार आम्ही सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत सखोल तपासणी करत होतो. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आर ब्लॉक आणि आयकर चौकात सतत तपासणी केली जात आहे. याच क्रमाने आयकर गोलांबरजवळ दारूच्या नशेत काही गुन्हेगार पकडले गेले. काहींवर स्नॅचिंगचा आरोप असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. काही वाहनांना दंडही ठोठावण्यात आला आहे.
डीएसपी म्हणाले की, तपासणीदरम्यान चारचाकी वाहनातून काही रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. याची माहिती आम्ही तात्काळ आयकर विभागाला दिली. आयकर विभागाचे लोक आले असून चौकशी करत आहे. एकूण रक्कम मोजल्यानंतर ती ७० लाख रुपये असल्याचं आढळून आलं. पकडलेल्या व्यक्तींचं म्हणणं आहे की ते अनेक प्रकारचे व्यवसाय करतात. त्याचाच हा पैसा आहे.