हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 15:12 IST2025-11-10T15:12:07+5:302025-11-10T15:12:31+5:30
उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील एका व्यक्तीचा लग्नाच्या पहिल्याच रात्री मृत्यू झाला आहे.

हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील एका व्यक्तीचा लग्नाच्या पहिल्याच रात्री मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री लग्न झालं होतं, त्यानंतर तो नववधूला घरी घेऊन आला आणि पहाटे ४ वाजता त्याचा मृत्यू झाला. या घटनेने नववधूसह सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. परवेझ आलम असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.परवेझ अमरोहा येथील मोहल्ला नौगाझा येथे राहत होता
परवेझ आलमचं लग्न अहमद कादरी यांची मुलगी सायमा कादरीसोबत झालं होतं. सायमा ३३ वर्षांची आहे. तर परवेझ ४२ वर्षांचा होता. रिपोर्टनुसार, परवेझची शनिवारी संध्याकाळी ६ वाजता त्याच्या घरातून मोहल्ला नल नई बस्ती येथील नायब बँक्वेट हॉलमध्ये जाण्यासाठी आनंदात वरात काढण्यात आली. रविवारी परवेझ आणि सायमाचं रिसेप्शनही याच बँक्वेट हॉलमध्ये आयोजित करण्यात आलं होतं.
परवेझ लग्न झाल्यानंतर नववधूला त्याच्या घरी घेऊन आला. घरी लग्नानंतरच्या सर्व विधी सुरू झाल्या. नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्य आनंदात होते, हसत होते आणि विनोद करत होते. याच दरम्यान अचानक पहाटे ४ वाजता परवेझच्या छातीत दुखू लागलं आणि त्याला खूप अस्वस्थ वाटू लागलं. त्याच्या कुटुंबाने उपचारासाठी त्याला तातडीने रुग्णालयात नेलं.
डॉक्टरांनी परवेझचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, परवेझला कोणताही आजार नव्हता. अचानक त्याची तब्येत बिघडली आणि हार्ट अटॅकने त्याचा मृत्यू झाला. लग्नानंतर लगेचच पतीच्या मृत्यूची बातमी ऐकताच नववधूला मोठा धक्का बसला. त्यांच्या लग्नातील काही व्हिडीओ आणि फोटो आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.