Parliament Monsoon Session Live Updates : राज्यसभेनंतर लोकसभेचंही कामकाज उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत स्थगित

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 15:53 IST2021-07-19T10:16:01+5:302021-07-19T15:53:46+5:30

Parliament monsoon Session Live: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात करण्यात आली. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परखड प्रश्न विचारा पण ...

Parliament Session Live updates The rainy session of Parliament begins from today fuel price hike covid 19 | Parliament Monsoon Session Live Updates : राज्यसभेनंतर लोकसभेचंही कामकाज उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत स्थगित

Parliament Monsoon Session Live Updates : राज्यसभेनंतर लोकसभेचंही कामकाज उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत स्थगित

Parliament monsoon Session Live: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात करण्यात आली. यादरम्यान पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी परखड प्रश्न विचारा पण सरकारलाही शांततामय वातावरणात उत्तर देऊ द्या, अशी विनंती विरोधकांना केली. 

LIVE

Get Latest Updates

03:45 PM

लोकसभेचंही कामकाज उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत स्थगित

राज्यसभेनंतर लोकसभेचंही कामकाज उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत स्थगित.

03:34 PM

राज्यसभेचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित

राज्यसभेचं कामकाज उद्या (मंगळवार) सकाळी ११ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे.

 

02:20 PM

विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभेचं कामकाज साडेतीन वाजेपर्यंत तहकूब

विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभेचं कामकाज साडेतीन वाजेपर्यंत, तर राज्यसभेचं कामकाज तीन वाजेपर्यंत तहकूब.


02:14 PM

सरकार संसदेला नोटीस बोर्डाप्रमाणे वापरू पाहतंय - थरूर

आपल्याला गैरव्यवस्थापन, चीन, शेतकरी, बेरोजगारी यांसह अनेक मुद्द्यांवर चर्चेसाठी तयार राहणं गरजेचं आहे. जर सरकार दररोज रचनात्मक पद्धतीनं चर्चा करण्यास तयार असेल तर लोकांच्या अपेक्षेप्रमाणे कामकाज चालेल. सरकार ससंदेला नोटीस बोर्डाप्रमाणे वापरू पाहत असल्याचं काँग्रेसचे नेते शशी थरूर म्हणाले.

 

02:11 PM

काँग्रेसचा गदारोळ निंदनीय : नरेंद्र सिंह तोमर

जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होतो आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी होतो, त्यानंतर पंतप्रधान नव्या सदस्यांची ओळख करून देतात. हीच परंपरा पंतप्रधान पार पाडत होते. परंतु काँग्रेसनं या ठिकाणी गदारोळ केला हे निंदनीय आहे, असं नरेंद्र सिंह तोमर म्हणाले. 

12:55 PM

राज्यसभेचं कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब

विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेनंतर राज्यसभेचंही कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे.

12:53 PM

लोकसभेनंतर राज्यसभेतही विरोधकांचा गदारोळ; पंतप्रधान म्हणाले, "विरोधकांची मानसिकता महिलाविरोधी"

यापूर्वी राज्यसभेचं कामकाज काही काळासाठी स्थगित करण्यात आलं होतं. राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. यादरम्यान, पंतप्रधानांनी भाषण केलं. दलित आदिवासी समुदायाच्या प्रतिनिधींमुळे काही लोकांना त्रास होत आहे. विरोधकांची मानसिकता महिला विरोधी आहे. विरोधकांना आदिवसी मत्र्यांचा परिचय पसंत नाही. सभागृहात हे पहिल्यांदा दिसत असल्याचं मोदी म्हणाले. 

11:55 AM

राजनाथ सिंह यांचा विरोधकांवर निशाणा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणादरम्यान विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसनं नव्या मंत्र्यांचा परिचय होऊन दिला नाही. २४ वर्षांमध्ये हे मी पहिल्यांदाच पाहिलं आहे. आज सभागृहाची परंपरा तोडण्यात आली : राजनाथ सिंह

11:47 AM

प्रचंड गदारोळात लोकसभेचं कामकाज २ वाजेपर्यंत स्थगित

लोकसभेच्या कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या मंत्र्यांचा परिचय करून दिला. परंतु विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे.

11:45 AM

शिरोमणी अकाली दलाचं संसदेबाहेर कृषी कायद्यांविरोधात आंदोलन

तीन नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शिरोमणी आकाली दलाच्या खासदारांनी संसदेबाहेर आंदोलन केलं. देशातील शेतकऱ्यांना न्याय हवा आहे. सर्व पक्षांनी केंद्र सरकारच्या विरोधात उभं राहावं आणि कायदा परत घेण्यावर त्यांच्यावर दबाव टाकावा, असं शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल म्हणाले.

 

11:38 AM

राज्यसभेचं कामकाज स्थगित; पुन्हा १२.२४ मिनिटांनी सुरू होणार सभागृहाचं कामकाज

राज्यसभेत यावर्षी ज्या खासदारांचं आणि बड्या व्यक्तींचं निधन झालं त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी दिवंगत ज्य़ेष्ठ अभिनेते दिलिप कुमार आणि भारताचे धावपटू दिवंगत मिल्खा सिंग यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर सभागृहाचं कामकाज १२.२४ मिनिटांपर्यंत स्थगित करण्यात आलं. 

11:20 AM

संसदेचं सत्र सुरू होताच विरोधाकांचा गदारोळ; गोंधळातच पंतप्रधानांचं संबोधन सुरू

लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संबोधन सुरू झालं आहे. संसदेच्या कामकाजाला सुरूवात होताच विरोधकांनी गदारोळ करण्यास सुरूवात केली. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधन सुरू केलं. अनेक दलित बांधव मंत्री बनले आहेत याचा आम्हाला आनंद आहे. अनेक मंत्री ग्रामीण भागातून आले आहेत. परंतु काही जणांना हे आवडत नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

11:12 AM

संसदेत कोरोना महासाथीबद्दल चर्चा केली जावी, सर्व खासदारांकडून सूचना मिळाव्यात : पंतप्रधान

कोरोनाच्या महासाथीचा परिणाम संपूर्ण जगावर दिसून येत आहे. संसदेत या महासाथीच्या संबंधात चर्चा केली जावी. खासदारांकडून सर्व सूचनाहील मिळाव्यात, जेणेकरून या महासाथीचा सामना करण्यासाठी आपल्या लढाईला अधिक बळकट करता येईल आणि कमतरतांना दूर केलं जाईल : पंतप्रधान

11:02 AM

परखड प्रश्न विचारा, पण सरकारला शांत वातावरणात उत्तर देण्याची संधी द्या : पंतप्रधान

या सदनात चर्चा केली गेली पाहिजे. देशाच्या जनतेला उत्तर हवं आहे, ते उत्तर देण्यासाठी सरकारची तयारी आहे. मी सर्व खासदार आणि राजकीय पक्षांना विनंती करतो की त्यांनी परखड  प्रश्न विचारावे, परंतु सरकारला शांत वातावरणात उत्तर देण्याची संधीही द्यावी, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

10:39 AM

Pegasus हॅकिंगचा वाद संसदेमध्ये?

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात यावेळी सरकार आणि विरोधीपक्षामध्ये खडाजंगी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ससंदेचं अधिवेशन सुरु होण्यापीर्वीच एक असा मुद्दा समोर आला आहे ज्यानं सर्वांच्या पायाखालची जमीन सरकवली आहे. Pegasus सॉफ्टवेअरद्वारे भारतातील अनेक पत्रकार, नेते आणि अन्य लोकांचे फोन हॅक करण्यात आल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमांनी केला होता. यावप खुलासा करण्यावरून संसदेत विरोधीपक्ष सरकारला घेरण्याची शक्यता आहे.

10:39 AM

आतापर्यंत ४० कोटींपेक्षा अधिक लोक लस घेऊन बाहुबली बनले : पंतप्रधान

मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला किमान लसीचा एक डोस मिळाला असेल. लस ही दंडावर घेतली जाते आणि ती जेव्हा घेतली जाते तेव्हा बाहुबली बनता. आतापर्यंत ४० कोटींपेक्षा अधिक लोक कोरोनाविरोधातील लढाईत बाहुबली बनले आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

 

10:22 AM

आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन

Web Title: Parliament Session Live updates The rainy session of Parliament begins from today fuel price hike covid 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.