हातात पुस्तक घेत राहुल गांधींचा मोठा दावा; 'त्या' विधानावर तीन-तीन मंत्र्यांनी घेतला तीव्र अक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 15:19 IST2026-02-02T15:09:54+5:302026-02-02T15:19:02+5:30

राहुल गांधींनी 'डोकलाम'बाबत जनरल नरवणेंच्या पुस्तकाचा उल्लेख केल्याने लोकसभेत गदारोळ!

Parliament Budget Session 2026 : Rahul Gandhi claims that China has intruded, Rajnath Singh-Amit Shah counterattack | हातात पुस्तक घेत राहुल गांधींचा मोठा दावा; 'त्या' विधानावर तीन-तीन मंत्र्यांनी घेतला तीव्र अक्षेप

हातात पुस्तक घेत राहुल गांधींचा मोठा दावा; 'त्या' विधानावर तीन-तीन मंत्र्यांनी घेतला तीव्र अक्षेप

Parliament Budget Session 2026 : लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका अप्रकाशित पुस्तकाचा उल्लेख केल्याने मोठा गोंधळ उडाला. यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल यांच्या दाव्यावर तीव्र अक्षेप नोंदवला.

काय म्हणाले राहुल गांधी?

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या एका मासिकातील /अप्रकाशित पुस्तकातील वक्तव्याचा हवाला देत चीनने भारतात घुसखोरी केल्याचा मोठा दावा केला. राहुल गांधी म्हणाले, चीनचे सैन्य भारतीय सीमेत घुसत आहे. चार चिनी टँक भारतीय हद्दीत घुसले आहेत. या दाव्यांनंतर सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद सुरू झाला.

राजनाथ सिंह यांचा कडवा आक्षेप

राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले, विरोधी पक्षनेत्यांनी संसदेची दिशाभूल करू नये. ज्या पुस्तकाचा किंवा मजकुराचा ते उल्लेख करत आहेत, तो अद्याप प्रकाशितच झालेला नाही. अशा अप्रमाणित संदर्भांचा वापर सभागृहाच्या नियमांच्या विरोधात आहे. राजनाथ सिंह यांनी लोकसभा अध्यक्षांकडे मागणी केली की, तथ्यांशिवाय आणि अप्रकाशित स्रोतांच्या आधारे विधान करण्यास परवानगी देऊ नये.

अमित शाहांची टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही राहुल गांधींच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया दिली. म्हणाले, राहुल गांधी प्रामाणिक आणि अधिकृत माहितीशिवाय वक्तव्य करत आहेत. एखाद्या मासिकात काहीही छापले जाऊ शकते. संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवावा. राहुल गांधींना कोणी सांगितले की चिनी टँक आले होते? अमित शाह यांनी हेही स्पष्ट केले की, सध्या चर्चा राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सुरू असून, विषयांतर करणे योग्य नाही.

याशिवाय, संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनीदेखील राहुल गांधींना थांबवत म्हटले, तुम्ही सभागृहाचे नियम मोडत आहात. संसद नियमांनुसार चालते आणि तुम्ही येथे अप्रकाशित पुस्तकाबद्दल बोलू शकत नाही.

संसदेतील वातावरण तापले

या मुद्द्यावरून लोकसभेत काही काळासाठी कामकाज ठप्प झाले. सत्ताधारी पक्षाने राहुल गांधींवर राष्ट्रीय सुरक्षेसारख्या संवेदनशील विषयावर जबाबदारीने बोलण्याची मागणी केली, तर विरोधकांनी सरकारवर चीनच्या प्रश्नावर स्पष्ट भूमिका मांडण्याचा दबाव टाकला. अखेर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांना बोलण्यापासून थांबवले. प्रकाशित न झालेली किंवा विश्वासार्हता नसलेली कुठलीही माहिती सदनात देणे योग्य नाही. तुम्ही राष्ट्रपतींच्या अभिभाषणात असलेल्या विषयांबद्दल बोललात किंवा सरकारी धोरणांवर टीका केलीत तर तुम्हाला कुणीही बोलण्यापासून अडवणार नाही. पण जर तुम्ही एखाद्या विषयावर दिशाभूल करणारी माहिती सदनात देत असाल तर मात्र तुम्हाला ते बोलता येणार नाही. मग मला नाईलाजाने तुम्हाला खाली बसवून पुढील लोकसभा सदस्याला बोलण्याची संधी द्यावी लागेल, असे म्हटले.

Web Title : राहुल गांधी के चीन के दावे पर हंगामा; राजनाथ सिंह, अमित शाह का पलटवार।

Web Summary : राहुल गांधी के चीन के घुसपैठ के दावे, एक अप्रकाशित स्रोत का हवाला देते हुए, संसद में हंगामा हुआ। राजनाथ सिंह और अमित शाह ने कड़ा विरोध जताया, जानकारी की प्रामाणिकता पर सवाल उठाया और गांधी पर सदन को गुमराह करने का आरोप लगाया।

Web Title : Rahul Gandhi's China claim sparks uproar; Rajnath Singh, Amit Shah retort.

Web Summary : Rahul Gandhi's claim about Chinese intrusion, citing an unpublished source, triggered a Parliament uproar. Rajnath Singh and Amit Shah strongly objected, questioning the authenticity of the information and accusing Gandhi of misleading the house.