पेपर लीक, डमी उमेदवार... ५० मुन्नाभाई असे बनले सब इन्स्पेक्टर, टॉपर नरेश विश्नोई अटकेत   

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 03:18 PM2024-03-05T15:18:23+5:302024-03-05T15:31:15+5:30

Rajasthan Paper Leak Case: राजस्थानमध्ये पेपर लीक प्रकरणामध्ये ट्रेनिंग घेत असलेल्या आणखी ३५ सब इन्स्पेक्टरना पेपर लीक खटल्यात आरोपी बनवण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपी टॉपर नरेश विश्नोई याला अटक करण्यात आली आहे. आता एकूण आरोपी सब इन्स्पेक्टरांची संख्या ५० वर पोहोचली आहे.

Paper Leak, Dummy Candidate...Rajasthan 50 Munnabhai Becomes Sub Inspector, Topper Naresh Vishnoi Arrested | पेपर लीक, डमी उमेदवार... ५० मुन्नाभाई असे बनले सब इन्स्पेक्टर, टॉपर नरेश विश्नोई अटकेत   

पेपर लीक, डमी उमेदवार... ५० मुन्नाभाई असे बनले सब इन्स्पेक्टर, टॉपर नरेश विश्नोई अटकेत   

राजस्थानमध्ये पेपर लीक प्रकरणामध्ये ट्रेनिंग घेत असलेल्या आणखी ३५ सब इन्स्पेक्टरना पेपर लीक खटल्यात आरोपी बनवण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपी टॉपर नरेश विश्नोई याला अटक करण्यात आली आहे. आता एकूण आरोपी सब इन्स्पेक्टरांची संख्या ५० वर पोहोचली आहे. एसओजीने सर्व ५० आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. ३५ नव्या आरोपींपैकी बहुतांश आरोपी हे पोलीस ट्रेनिंग सेंटरमधून पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. काल ताब्यात घेण्यात आलेल्या १५ पैकी १३ आरोपीना अटक करण्यात आली आहे. आता सरकार त्यांना बरखास्त करणार आहे.

राजस्थान पेपर लीक प्रकरणामध्ये एका तपास अधिकाऱ्याने सांगितले की, भरती परीक्षेमध्ये टॉप करणाऱ्या एका व्यक्तीसह १५ प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांना लीक झालेल्या प्रश्नपत्रिका आणि डमी उमेदवारांचा उपयोग करून परीक्षा पास झाल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले आहे. 

पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप (एसओजी)च्या एका पथकाने राजस्थान पोलीस अकादमीमध्ये पोहोचली. तसेच तिथे प्रशिक्षण घेत असलेल्या संशयितांना ताब्यात घेण्यात आले. अधिकाऱ्याने सांगितले की, एका उपनिरीक्षकाला अजमेरमधील किशनगड येथील पोलीस प्रशिक्षण संस्थेतून आणि इतर दोघांना त्यांच्या गावातून ताब्यात घेतले. 

राज्य पोलिसांच्या एटीएस आमि एसओजीचे एडीजी व्ही. के. सिंह यांनी सांगितले की, राजस्थान लोकसेवा आयोगाने २०२१ मध्ये सब इन्स्पेक्टर आणि प्लाटून कमांडर भरती परीक्षा आयोजित केली होती. दरम्यान, एका गुन्हेगारी टोळीने या परीक्षेची प्रश्नपत्रिका लीक केली होती. तसेच काही उमेदवारांची भरतीही घडवून आणली होती. तपासामध्ये ही बाब समोर आली होती, त्यानंतर एफआयआर नोंदवली. त्यानंतर संशयित १५ प्रशिक्षणार्थी सब इन्स्पेक्टरनां ताब्यात घेण्यात आले.  आता त्यांना अधिक चौकशीसाठी एसओजी मुख्यालयात आणण्यात आलं आहे.

परीक्षेरपूर्वी प्रश्नपत्रिका मिळवण्याशिवाय काही परीक्षार्थींसाठी डमी उमेदवारांची व्यवस्थाही करण्यात आली असावी, असा तपास यंत्रणांना संशय आहे. ज्यांच्यामध्ये स्वत: परीक्षा देण्याची योग्यता नव्हती अशा व्यक्तींसाठी ही व्यवस्था करण्यात आली होती. 

Web Title: Paper Leak, Dummy Candidate...Rajasthan 50 Munnabhai Becomes Sub Inspector, Topper Naresh Vishnoi Arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.