शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

Budget 2020 : आता आधार कार्ड असेल तर लगेच मिळणार पॅन कार्ड, अर्थमंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2020 3:36 PM

निर्मला सीतारामन यांनी आधार कार्ड असेल तर त्याच्या आधारे तुम्हाला लगेचच पॅन कार्ड मिळू शकेल अशी घोषणा केली आहे.

ठळक मुद्देनिर्मला सीतारामन यांनी आधार कार्ड असेल तर त्याच्या आधारे तुम्हाला लगेचच पॅन कार्ड मिळू शकेल अशी घोषणा केली.सरकारने पॅन कार्ड मिळण्याची प्रक्रिया ही अधिक सोपी केली.इन्स्टंट अलॉटमेंट सिस्टम ही सरकारच्यावतीने लाँच करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पात शेती, उद्योग आणि शिक्षणामध्ये भरीव तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच करदात्यांना दिलासा देण्यात आला आहे. आधार कार्ड आणि पॅन कार्ड संदर्भात अर्थमंत्र्यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे प्रत्येक कामासाठी उपयोगी पडतं. तसेच सरकारी योजनांसाठी ते लिंक करणं गरजेचं झालं आहे.  

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आधार कार्ड असेल तर त्याच्या आधारे तुम्हाला लगेचच पॅन कार्ड मिळू शकेल अशी घोषणा केली आहे. सरकारने पॅन कार्ड मिळण्याची प्रक्रिया ही अधिक सोपी केली आहे. इन्स्टंट अलॉटमेंट सिस्टम ही सरकारच्यावतीने लाँच करण्यात आली आहे. यामुळे आधार कार्ड असेल तर लगेचच पॅन कार्ड मिळणार आहे. आतापर्यंत पॅन कार्ड काढण्यासाठी मोठी प्रकिया होती. मात्र आता सरकारने ते काम सोपं केलं आहे.   

प्राप्तिकर विभागाने पॅन-आधार लिंक करण्याची मुदत मार्च 2020 पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे करदात्यांनी पॅन कार्ड अजूनही आधार कार्डशी लिंक केले नसेल तर त्यांच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. 31 डिसेंबरपर्यंत पॅन कार्डआधार कार्डशी लिंक करणे सक्तीचे आहे, याची आठवण प्राप्तिकर विभागाने गेल्या पंधरा दिवसांपूर्वी  एका जाहीर निवेदनाद्वारे करदात्यांना करून दिली होती. मात्र, आता प्राप्तिकर विभागाने  पॅन-आधार लिंक करण्याची मुदत केंद्र सरकारने मार्च 2020 पर्यंत वाढवली आहे. 

आधार कार्डाशी पॅन कार्ड असे करा लिंक 

- सर्वप्रथम https://www.incometaxindiaefiling.gov.in या इन्कम टॅक्सच्या ई-पोर्टलवर लॉग इन करावे.

- होम पेजच्या डाव्या बाजूला असलेल्या लिंक आधार या पर्यायावर क्लिक करा.

- पर्यायावर क्लिक केल्यावर तेथे पॅन कार्डचा नंबर तसेच आधार नंबर, आधार कार्डावर असलेले नाव टाकावे.

- आधार कार्डावर केवळ जन्माचे वर्ष असल्यास त्या पर्यायाला टीक करावी.

- सर्व माहिती भरल्यानंतर तेथे असलेला कॅप्चा टाकून सबमिट करावे.

- लिंक झाल्यावर एक मेसेज मिळेल. जर आपले पॅन आणि आधार कार्ड आधीच लिंक झालेले असेल, तर तसा मेसेज आपल्याला दिसेल. एसएमएसद्वारेही हे लिंक करता येते. 

महत्त्वाच्या बातम्या

Budget 2020 : सरकार एलआयसीमधील आपली भागीदारी विकणार, अर्थसंकल्पामधून मोठी घोषणा

Budget 2020 Income Tax : इन्कम टॅक्सचे स्लॅब बदलले अन् कररचनाही; अर्थमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा

Budget 2020 : वीज मीटर प्रीपेड होणार, कंपनी आणि दर निवडण्याचा पर्याय असणार

Budget 2020: मोदी सरकार मुलींच्या लग्नाचं वय बदलणार? निर्मला सीतारामन यांनी दिले संकेत

Budget 2020 : मोदी सरकारचे 'उड्डाण'; देशभरात 100 विमानतळ कार्यरत करणार

Budget 2020: शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारच्या १६ मोठ्या घोषणा 

 

टॅग्स :budget 2020बजेटBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनAdhar Cardआधार कार्डPan Cardपॅन कार्डIndiaभारतEconomyअर्थव्यवस्था