Lokmat Money > बिझनेस न्यूज > New Income Tax Slab 2020 : इन्कम टॅक्सचे स्लॅब बदलले अन् कररचनाही; अर्थमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा

New Income Tax Slab 2020 : इन्कम टॅक्सचे स्लॅब बदलले अन् कररचनाही; अर्थमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा

New Income Tax Slab 2020 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज अर्थसंकल्प सादर करत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 01:09 PM2020-02-01T13:09:41+5:302020-02-01T13:36:40+5:30

New Income Tax Slab 2020 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज अर्थसंकल्प सादर करत आहेत.

Budget 2020 Income Tax: Income tax slabs changed and structured; Important announcement of the Finance Minister | New Income Tax Slab 2020 : इन्कम टॅक्सचे स्लॅब बदलले अन् कररचनाही; अर्थमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा

New Income Tax Slab 2020 : इन्कम टॅक्सचे स्लॅब बदलले अन् कररचनाही; अर्थमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा

Highlightsकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थसंकल्पातून करदात्यांना दिलासा देण्यात आला आहे. करदात्यांच्या कररचनेत बदल करण्यात आलेला आहे.  पाच ते साडेसात लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना फक्त 10 टक्के कर आकारला जाणार आहेत. 

नवी दिल्लीः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थसंकल्पातून करदात्यांना दिलासा देण्यात आला आहे. करदात्यांच्या कररचनेत बदल करण्यात आलेला आहे. पाच ते साडेसात लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना फक्त 10 टक्के कर आकारला जाणार आहेत. 5 ते 7.5 लाखदरम्यान करपात्र उत्पन्न असणाऱ्यांना 10 टक्के कर वसूल केला जाणार आहे. तर 7.50 ते 10 लाखांसाठी 15 टक्के कर आकारला जाणार आहे. तसेच 10 ते 12.5  लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांकडून 20 टक्के कर आकारला जाणार आहे. ज्यांचं वार्षिक उत्पन्न 12.5 ते 15 लाख आहे, त्यांच्याकडून 25 टक्के कर आकारला जाणार आहे. वार्षिक उत्पन्न 15 लाखांहून अधिक असणाऱ्यांकडून 30 टक्के प्राप्तिकर आकारला जाणार आहे. 

या कररचनेत बदल करण्यात आलेला असून, वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपये असणाऱ्यांना करमुक्त करण्यात आलं. त्यांना करातून सूट देण्यात आली आहे. तत्पूर्वी ज्यांचं  वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपर्यंत आहे, त्यांच्याकडून कोणताही कर वसूल केला जात नव्हता. तसेच 2.5 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंत एकूण वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांकडून 5 टक्के कर आकारला जात होता.


तर 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांकडून 20 टक्के प्राप्तिकर आकारला जात होता. वर्षाला 10 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांकडून 30 टक्के कर आकारला जात होता. विमा हप्ता, पीएफमधलं योगदान, मुलांच्या शाळेची फी, घरावरील कर्ज, पीपीएफमधलं योगदान ही सर्व गुंतवणूक कलम 80 सीअंतर्गत येते. एवढ्या सर्व गुंतवणुकीवर दीड लाखापर्यंत करातून सूट मिळते. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

Budget 2020: शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारच्या १६ मोठ्या घोषणा 

Budget 2020: बजेटमध्ये काश्मिरी रंग; निर्मला सीतारामन यांनी वाचली खास कविता

Budget 2020 : महागाई नियंत्रणात आणण्यात मोदी सरकारला यश- निर्मला सीतारामण

Budget 2020: अर्थसंकल्प सादर होत असताना मोदी सरकारसाठी मोठी खूशखबर

Read in English

Web Title: Budget 2020 Income Tax: Income tax slabs changed and structured; Important announcement of the Finance Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.