Budget 2020 : Impact On aviation, railway sector of India; Explained in Marathi Modi government's will operate 100 new airports, increasing tejas Express | Budget 2020 : मोदी सरकारचे 'उड्डाण'; देशभरात 100 विमानतळ कार्यरत करणार

Budget 2020 : मोदी सरकारचे 'उड्डाण'; देशभरात 100 विमानतळ कार्यरत करणार

ठळक मुद्दे 550 रेल्वे स्थानकांवर वाय फाय सुविधा देण्यात येणार आहे.27 हजार किमी ट्रॅकचे विद्युतीकरण केले जाणार आहे. तेजस सारख्या ट्रेनची संख्या वाढविण्यात येणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी शेती, उद्योग आणि शिक्षणामध्ये भरीव तरतूद करण्याची घोषणा केली. तसेच देशातील दळणवळण सुधारण्यासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये रेल्वे खाते, विमानतळ यासह तब्बल 19 हजार हायवे उभारण्यात येणार आहेत. 


यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 550 रेल्वे स्थानकांवर वाय फाय सुविधा देण्यात येणार आहे. 27 हजार किमी ट्रॅकचे विद्युतीकरण केले जाणार आहे. सोलार पावर ग्रीड रेल्वे रुळांच्या बाजुलाच तयार करण्यात येणार आहे. तेजस सारख्या ट्रेनची संख्या वाढविण्यात येणार आहे. बेंगळुरूमध्ये मुंबई लोकलप्रमाणे उपनगरीय ट्रेन सुरू करण्यात येणार आहेत. केंद्र सरकार यासाठी 25 टक्के निधी देणार आहे. यासाठी 18600 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 

नितीन गडकरींचे खाते सुस्साट; तब्बल 19 हजार किमींचे महामार्ग बांधणार


यानंतर सीतारामन यांनी हवाई वाहतुकीकडे मोर्चा वळविला. उड्डाण मोहिमेंतर्गत 2024 पर्यंत 100 विमानतळ सुरू केले जाणार आहेत. याशिवाय 46 राखीव हवाई पट्टी, 16 खासगी ग्रीनफिल्ड विमानतळ, 15 एअरपोर्ट ऑथरिटी विमानतळ, 31 हेलिपोर्ट, 12 वॉटरड्रोम्स विकसित केले जाणार आहेत. 2023 पर्यंत सरकारकडे 1200 विमाने असणार आहेत. इलेक्ट्रॉनिक मॅन्यूफॅक्चरिंग इंडस्ट्रीला प्रोत्साहन देण्यासाठी अर्थमंत्र्यांकडून नव्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. ५ वर्षांत १०० लाख कोटींच्या गुंतवणुकीचं लक्ष्य सरकारने ठेवलं आहे.


Web Title: Budget 2020 : Impact On aviation, railway sector of India; Explained in Marathi Modi government's will operate 100 new airports, increasing tejas Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.