पान : ६ थोडक्यात - जोड
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:33+5:302015-02-18T00:13:33+5:30
हरिनाम सप्ताह

पान : ६ थोडक्यात - जोड
ह िनाम सप्ताहलिंबेजळगाव/सावखेडा : श्रीक्षेत्र सावखेडा येथील मध्वमुनीश्वर समाधी मंदिरात हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा २० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यानिमित्ताने सप्ताहभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. २७ फेब्रुवारी रोजी सप्ताहाची सांगता होईल.रस्त्याचे भूमिपूजनदावरवाडी : नांदर ते नवगाव या दीड कि.मी. रस्त्याचे भूमिपूजन सोसायटीचे चेअरमन रामचंद्र काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, ॲड. किशोर वैद्य, पुष्पाताई काळे, शंकरराव राऊत, सरपंच यशवंतराव काळे, उपसरपंच नरहरी रोडगे आदी उपस्थित होते.सेवालाल जयंती साजरीकन्नड : तालुक्यातील मुंडवाडी तांडा येथे संत सेवालाल यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मगनदास राठोड, युवराज राठोड, नारायण राठोड, पोपट राठोड, प्रवीण राठोड, नागोराव राठोड, रामेश्वर राठोड आदी उपस्थित होते.