बीएसएफच्या पलटवाराने पाकिस्तानची दाणादाण, गोळीबार थांबवण्याची केली विनंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2018 16:36 IST2018-05-20T16:33:24+5:302018-05-20T16:36:20+5:30
गेल्या काही दिवसांपासून नियंत्रण रेषेवर आगळीक करत असलेल्या पाकिस्तानला बीएसएफच्या जवानांनी आज चोख प्रत्युत्तर दिले. बीएसएफने गोळ्यांचा वर्षाव करत दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरामुळे सीमेपलीकडे पाकिस्तानी जवानांची दाणादाण उडाली.
बीएसएफच्या पलटवाराने पाकिस्तानची दाणादाण, गोळीबार थांबवण्याची केली विनंती
जम्मू - गेल्या काही दिवसांपासून नियंत्रण रेषेवर आगळीक करत असलेल्या पाकिस्तानला बीएसएफच्या जवानांनी आज चोख प्रत्युत्तर दिले. बीएसएफने गोळ्यांचा वर्षाव करत दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरामुळे सीमेपलीकडे पाकिस्तानी जवानांची दाणादाण उडाली. बीएसएफच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत पाकिस्तानच्या एका सैनिकाचा मृत्यू झाला. त्यानंतरत भेदरलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी कारवाई थांबवण्याची विनंती केली.
या कारवाईबाबत माहिती देणारी एक 19 सेकंदांची चित्रफीत बीएसएफने प्रसिद्ध केली आहे. या चित्रफितीमध्ये भारताच्या प्रत्युत्तरदाखल कारवाईत पाकिस्तानची एक चौकी उद्ध्वस्त होताना दिसत आहे. यासंदर्भात बीएसएफच्या प्रवक्त्याने सांगितले की, "पाकिस्तानी रेंजर्सनी जम्मू बीएसएफ फॉर्मेशनला आज फोन केला आणि गोळीबार थांबवण्याची विनंती केली." एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानी सैन्याकडून आंतरराष्ट्रीय सीमेवर विनाकार गोळीबार आणि तोफांचा मारा करण्यात आला. त्यानंतर भारतीय जवानांनीसुद्धा त्याला चोख प्रत्युत्तर दिले. अखेरीस पाकिस्तानी रेंजर्सनी बीएसएफला हा गोळीबार थांबवण्याची विनंती केली.
#WATCH: BSF troops on the western borders, bust a bunker across international boundary on May 19. #JammuAndKashmir (Source: BSF) pic.twitter.com/MaecGPf7g3
— ANI (@ANI) May 20, 2018