JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 00:32 IST2025-05-09T00:30:52+5:302025-05-09T00:32:46+5:30

भारत-पाक तणाव वाढला, पाकचे नापाक इरादे परतवून लावण्याची लढाई सुरु

Pakistani Pilots In Indias Custody Who Had Entered In Indian Territory With A Fighter Major Action Amid Operation Sindoor India Pakistan War | JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात

JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात

भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थिती शिगेला पोहचली आहे. भारतीय हवाई दलाने ऑपरेशन दरम्यान एक पाकिस्तानी पायलटला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. हा पायलट पाकिस्तानी हवाई दलाच्या JF १७ या लढाऊ विमानासह भारताच्या हद्दीत घुसला होता. त्याला राजस्थानच्या लाठी येथे पकडण्यात आले आहे. या पायलटची चौकशी सुरु आहे. भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी अद्याप या पायलटसंदर्भातील कोणताही माहिती अद्याप सार्वजनिक केलेली नाही. पण हा पायलट पाकिस्तानी हवाई दलातील वरिष्ठ अधिकारी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

भारत-पाक तणाव वाढला, पाकचे नापाक इरादे परतवून लावण्याची लढाई सुरु

जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. ज्यात २६ निष्पाप नागरिकांनी जीव गमावला होता. भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत १५ दिवसांतच याचा बदला घेताना पाकिस्तानमध्ये घुसून दहशवाद्यांची ९ तळे उद्धस्त केली होती. गुरुवारी रात्री पाककडून राजस्थान, पंजाब आणि जम्मू परिसरात ड्रोन आणि लढाऊ विमानांसह हल्ले करण्याचा प्रयत्न झाला. भारतीय लष्काराने हा प्रयत्न हाणून पाडला असून त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारताची लढाऊ विमानांचा जथ्था पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावला आहे. भारताने लाहोरमध्ये असलेले पाकिस्तानचे AWACS (एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम) उद्धवस्त केल्याची माहितीही समोर येत आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक नापाक कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताच्या सर्व संरक्षण यंत्रणा सध्या पूर्णपणे सक्रिय असून, पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्धवस्त

पाकिस्तानची ३ विमाने पाडली

पाकिस्तानी हवाई दलाने भारतीय हद्दीत घुसून हल्ले करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय सैन्याने पाकची  लढाऊ विमाने पाडली. यात  दोन JF-17 आणि एक F-16 लढाऊ विमानांचा समावेश आहे. यापैकी एका विमानातील पायलटला पकडण्यात आले आहे. 

Web Title: Pakistani Pilots In Indias Custody Who Had Entered In Indian Territory With A Fighter Major Action Amid Operation Sindoor India Pakistan War

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.