शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

सुंजवां हल्ल्याची किंमत पाकिस्तानला चुकवावी लागणार - निर्मला सीतारमण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 9:31 AM

जम्मूतील सुंजवां येथील लष्करी तळ आणि करण नगर परिसरातील सीआरपीएफ मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संरक्षणंत्री निर्मला सीतारमण यांनी पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे.

श्रीनगर - जम्मूतील सुंजवां येथील लष्करी तळ आणि करण नगर परिसरातील सीआरपीएफ मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. सुंजवां येथील लष्कर तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 6 जवान शहीद झाले होते आणि काही जण जखमीदेखील झाले होते. सीतारमण यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी सीतारमण यांनी पाकिस्तानला या हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशाराच दिला. पत्रकार परिषद घेत सीतारमण यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  ''सुंजवांमधील हल्ला हा जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरने घडवून आणला आहे. भारत पाकिस्तानला दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्येकवेळी पुरावा देत आहे. मात्र, याची फिकीर पाकिस्तानला नाही त्यामुळे त्यांना आता याची किंमत चुकवावी लागेल'', असे सीतारमण यांनी यावेळी म्हटले. 

सीतारमण यांच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वपूर्ण मुद्दे1 -  सुंजवां येथील लष्करी तळावर ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यांना पाकिस्तानातून मदत करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे2 - जैश-ए-मोहम्महदच्या ज्या दहशतवाद्यांना हल्ला केला, त्या दहशतवाद्यांनी काही दिवसांपूर्वीच भारतात घुसखोरी केली असावी. स्थानिक नागरिकांकडून घुसखोरीसाठी मदत मिळाल्याचंही शक्यता वर्तवण्यता येत आहे.  3 - दहशतवादी आता कमजोर घटकांना टार्गेट करू शकतात. यासाठी सुंजवांतील लष्करी तळावर फॅमिली क्वॉटर्स परिसरातही कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 4 - पाकपुरस्कृत दहशतवादी कारवाया आता पीर पंजाल रेंजच्याही पुढे पसरत चालल्या आहेत. शिवाय, भारतात दहशतवाद्यांना घुसवण्यासाठी पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप सीतारामण यांनी केला आहे. 5 - पाकिस्तानाकडून वारंवार होणा-या दहशतवादी हल्ल्यांना आणि आमच्या देशात हिंसा पसरवण्यासाठी प्रयत्न करणा-यांना सडेतोड उत्तर देऊ - निर्मला सीतारमण6 - या हल्ल्यानंतर सर्व पुरावे गोळा केलेले आहेत आणि एनआयएकडून याबाबत चौकशी करण्यात येत आहे.  7 - या सर्व पुराव्यांना पाकिस्तानकडे सुपुर्द करण्यात येणार आहे. कित्येक पुरावे, अहवाल सोपवल्यानंतरही पाकिस्ताननं तेथील दहशतवाद्यांविरोधात कोणतेही ठोस पाऊल उचलत कारवाई केलेली नाही. 8 - भारतातील दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानचा हात असल्याचं वारंवार समोर आले आहे. 9 - आता सीमारेषेवर अत्याधुनिक शस्त्रांसहीत सैन्य तैनात केले जाणार आहे आणि देखरेखदेखीव वाढवण्यात येईल.10 - शहीद जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही. पाकिस्तानला या हल्ल्याची किंमत चुकवावी लागणार आहे. 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनIndian Armyभारतीय जवानTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवाद