शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

पाकिस्तानचे हायटेक कारस्थान, ड्रोणद्वारे भारतात करताहेत ड्रग्जची तस्करी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2018 5:46 PM

पाकिस्तानकडून सीमावर्ती राज्यांमध्ये होणारी अमली पदार्थांची तस्करी ही भारतासाठी नेहमीची डोकेदुखी ठरत आहे. त्यात सुरक्षा दलांची नजर चुकवून भारतात अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी पाकिस्तानने हायटेक कारस्थान रचले आहे.

चंदिगड - पाकिस्तानकडून सीमावर्ती राज्यांमध्ये होणारी अमली पदार्थांची तस्करी ही भारतासाठी नेहमीची डोकेदुखी ठरत आहे. त्यात सुरक्षा दलांची नजर चुकवून भारतात अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी पाकिस्तानने हायटेक कारस्थान रचले आहे. त्यानुसार पंजाबसारख्या पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या राज्यांमध्ये पाकिस्तानकडून  ड्रोणच्या मदतीने हेरॉइनसारख्या अमली पदार्थांची तस्करी करण्यात येत आहे.  पंजाबमधील सीमेजवळच्या गावांमध्ये असे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत.  बीएसएफच्या गुप्तहेर विभागामधील सूत्रांनी पाकिस्तानकडून अशा प्रकारे तस्करी होत असल्याच्या माहितीस दुजोरा दिला आहे. गुरुदासपूरमधील सीमेला लागून असलेल्या गावामध्ये काही दिवसांपूर्वी असा प्रकार समोर आला होता. त्यावेळी प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळलेले अमली पदार्थ घेऊन जमिनीपासून 200 मीटरपर्यंत उंच उडू शकणारे एक ड्रोण भारताच्या हद्दीत घुसले. मात्र सुरक्षा दलांच्या नजरेस पडताच हे ड्रोण अमली पदार्थ न टाकताच पाकिस्तानच्या हद्दीत पसार झाले. मात्र या घटनेमुळे पाकिस्तानकडून हायटेक पद्धतीने होत असलेली अमली पदार्थांची तस्करी बीएसएफच्या नजरेत आली आहे. अशाच प्रकारचे एक ड्रोण सीमावर्ती भागात असलेल्या सहारन येथेही दिसून आले होते.  हल्लीच्या काळात तस्करीसाठी वापरण्यात आलेला हा नवा पर्याय असल्याचे बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याआधी सराईत स्कूबा डायव्हर्सच्या मदतीने सतलज आणि रावी नदीमधून पाकिस्तान भारतात अमली पदार्थांची तस्करी करत असे.  पाकिस्तानची 553 किमी सीमा पंजाबला लागून आहे. या सीमेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी बीएसएफकडे आहे. दरम्यान गुप्तहेर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानमधून पंजाबमधील अबोहर, फिरोझपूर, अमृतसर आणि गुरुदासपूर जिल्ह्यांमध्ये हेरॉइनची तस्करी होते. 2017 साली बीएएफने 270 किलो हेरॉइन आणि अन्य अमली पदार्थ जप्त केले होते.  

टॅग्स :Drugsअमली पदार्थPakistanपाकिस्तानIndiaभारतPunjabपंजाब