५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 17:35 IST2025-07-01T17:34:07+5:302025-07-01T17:35:41+5:30
भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव असतानाही मोठा खुलासा! पाकिस्तानच्या तुरुंगात सध्या किती भारतीय कैदी आहेत, याची आकडेवारी समोर आली आहे.

५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीदारम्यानच आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्यातुरुंगांमध्ये सध्या २४६ भारतीय नागरिक कैद आहेत, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत निवेदनात दिली आहे.
या २४६ भारतीयांमध्ये ५३ सामान्य नागरिक आणि १९३ मच्छीमार आहेत. कैद असलेले हे मच्छीमार प्रत्यक्ष भारतीय आहेत किंवा त्यांच्यावर भारतीय असल्याचा दावा करण्यात आला आहे.
दरवर्षी होते कैद्यांची यादीची देवाणघेवाण
भारत आणि पाकिस्तानमध्ये २००८मध्ये झालेल्या दूतावासीय संपर्क कराराअंतर्गत (Consular Access Agreement) दरवर्षी १ जानेवारी आणि १ जुलै रोजी दोन्ही देश एकमेकांना त्यांच्या तुरुंगात असलेल्या दुसऱ्या देशाच्या नागरिकांची यादी देतात. आज (१ जुलै २०२५) ही प्रक्रिया पार पडली असून, यामध्येच पाकिस्तानने २४६ भारतीयांची माहिती भारताला दिली आहे.
भारताच्या तुरुंगातही ४६३ पाकिस्तानी नागरिक
भारताकडून पाकिस्तानला दिलेल्या यादीनुसार, भारतात सध्या ३८२ पाकिस्तानी नागरिक आणि ८१ पाकिस्तानी मच्छीमार कैद आहेत. भारत सरकारनुसार, त्यांच्यावरही आवश्यक कारवाई सुरू आहे.
२०१४पासून किती भारतीय सुटले?
भारत सरकारच्या माहितीनुसार, २०१४पासून पाकिस्तानने २,६६१ भारतीय मच्छीमार आणि ७१ नागरिकांना सोडले आहे. २०२३ मध्ये ५०० मच्छीमार आणि १३ नागरिक भारतात परतले आहेत.
भारताने स्पष्ट केले आहे की, कैद्यांशी संबंधित मानवीय बाबी राजकीय नात्यांपेक्षा अधिक महत्त्वाच्या आहेत. निर्दोष लोकांनी वर्षानुवर्षं तुरुंगात सडत राहू नये, यासाठी भारत सरकार सक्रिय आहे.
भारताची पाकिस्तानकडे ठाम मागणी
पाकिस्तानच्या तुरुंगात कैद असलेल्या १५९ भारतीय कैद्यांची शिक्षा पूर्ण झाली असून, त्यांना तात्काळ भारतात परत पाठवावे, अशी मागणी भारताने केली आहे. तसेच, २६ कैद्यांना दूतावासीय संपर्काची परवानगी द्यावी, अशीही मागणी भारताकडून करण्यात आली आहे.
भारतही जबाबदारी पार पाडतोय!
भारत सरकारने देखील ८० पाकिस्तानी कैद्यांच्या राष्ट्रीयतेची पुष्टी करण्यासाठी त्यांची माहिती पाकिस्तानकडे पाठवली आहे. परंतु, पाकिस्तानकडून अद्याप कोणतीही सूचना न आल्याने त्यांची पाठवणी थांबली आहे.