बाईकच्या नंबर प्लेटवर 'पाक की दीवानी' लिहिलं, गावकऱ्यांनी लाथा-बुक्क्यांनी बदडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 11:42 IST2018-12-24T11:41:33+5:302018-12-24T11:42:22+5:30
बरोटीवाला गावात पोहोचलेल्या तरुणांच्या दुचाकीवरील नंबर प्लेट पाहून गावकऱ्यांचा राग अनावर झाला.

बाईकच्या नंबर प्लेटवर 'पाक की दीवानी' लिहिलं, गावकऱ्यांनी लाथा-बुक्क्यांनी बदडलं
शिमला - हिमाचल प्रदेशमधील सोलन जिल्ह्यात बाईकस्वाराला चांगलच बदडून काढण्यात आलं आहे. औद्योगिक वसाहत बरोटीवालाच्या झाडमाजरी येथे दोन तरुणांना ही मारहाण करण्यात आली आहे. एका दुचाकीवर हे दोन तरुण झाडमाजरी गावात पोहोचले होते. त्यावेळी, या युवकांकडे असलेल्या गाडीवर 'पाक की दीवानी' असे लिहिले होते. त्यामुळे गावातील तरुणांनी या दोघांना मारहाण केली.
बरोटीवाला गावात पोहोचलेल्या तरुणांच्या दुचाकीवरील नंबर प्लेट पाहून गावकऱ्यांचा राग अनावर झाला. त्यामुळे या दोघांनाही गावकऱ्यांकडून लाथ-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे स्थानिकांकडून पोलीस स्थानक बरोटीवाला यांच्याकडेही याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर, पोलिसांच्या एका पथकाने घटनास्थळावर जाऊन त्या दोन युवकांना ताब्यात घेतलं. तसेच पोलिसांनी बाईकही ताब्यात घेतली असून याप्रकरणी तपास करण्यात येत आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हे दोन्ही दुचाकीस्वार उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. मात्र, या दोघांनी त्यांच्या दुचाकीवर पाक की दीवानी असे का लिहिले हे अद्याप स्पष्ट नाही. पोलिसांकडून त्याबाबतचा तपासु सुरु असल्याचे सांगण्यात आले.