अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 22:09 IST2025-04-25T22:08:31+5:302025-04-25T22:09:24+5:30
Pahalgam Terror Attack: सिंधू पाणी करारासंदर्भात आज अमित शाहांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक झाली.

अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानसोबत असलेला सिंधू पाणी करार स्थगित केला आहे. या करारासंदर्भात शुक्रवारी(25 एप्रिल) गृहमंत्री अमित शाहा यांच्या निवासस्थानी पाण्याचे व्यवस्थापन आणि वापराबाबत बैठक झाली. या बैठकीत परराष्ट्र मंत्री, जलशक्ती मंत्री आणि तिन्ही मंत्रालयांचे सचिव स्तरावरील अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पाकिस्तानला जाणारे पाणी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
India has suspended the Indus Waters Treaty with Pakistan following the Pahalgam terror attack
— ANI (@ANI) April 25, 2025
Union Minister of Jal Shakti, CR Paatil says, "A roadmap was prepared in the meeting with Union Home Minister Amit Shah. Three options were discussed in the meeting. The government is… pic.twitter.com/uHZMMehAW3
पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही
केंद्रीय जलसंपदा मंत्री सीआर पाटील यांनी एक मोठे विधान केले आहे. सीआर पाटील म्हणाले की, सिंधू पाणी कराराबाबत घेतलेल्या निर्णयाचे पालन केले जाईल. हा निर्णय तीन टप्प्यात लागू केला जाईल. तात्काळ, मध्यावधी आणि दीर्घकालीन. एक थेंबही पाणी पाकिस्तानात जाऊ नये, यासाठी व्यवस्था केली जाईल. भारताच्या या कारवाईचा परिणाम लवकरच पाकिस्तानवर दिसून येईल.
जागतिक बँकेला माहिती दिली जाईल
दरम्यान, भारतातून पाकिस्तानला जाणारे पाणी थांबवल्यानंतर धरणांची क्षमता वाढवली जाईल. धरणांची क्षमता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, जेणेकरून जास्त पाणी साठवता येईल. यासाठी धरणांमधील गाळ काढला जाईल. धरणांचे फ्लशिंगदेखील केले जाईल. हा करार जागतिक बँकेने केला होता, त्यामुळे त्यांनाही भारत सरकारच्या या निर्णयाची माहिती दिली जाईल.