शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅटलस सायकल’च्या शेवटच्या कारखान्याचे ‘पॅडल’ थांबले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 05:14 IST

‘जागतिक सायकलदिनी’च थांबविले उत्पादन

नवी दिल्ली : एकेकाळी देशात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या ‘अ‍ॅटलस सायकल’ने दिल्लीजवळील साहिबाबाद येथील आपला शेवटचा सायकल उत्पादक कारखाना बंद केला आहे. कंपनीने ३ जून रोजी या प्रकल्पातील काम थांबविले. योगायोग म्हणजे त्यादिवशी ‘जागतिक सायकल दिन’ होता. कंपनीने शेवटच्या ४३१ कर्मचाऱ्यांनाही काढून टाकले आहे.

याआधी मालनपूर आणि सोनिपत येथील प्रकल्प कंपनीने बंद केले आहेत. १९५१ साली सोनिपत येथील प्रकल्पानेच कंपनीची सुरुवात झाली होती. १९८२ साली दिल्लीतील आशियाई खेळांसाठी कंपनीने सायकली पुरविल्या होत्या.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीएमडी) एन. पी. सिंह राणा यांनी सांगितले की, कारखाना हंगामी स्वरूपात बंद करण्यात आला आहे. कंपनीकडे वापर नसलेला एक भूखंड पडून आहे. तो विकून ५० कोटी रुपये उभे केले जातील. त्यानंतर कारखाना पुन्हा सुरू केला जाईल.

काढण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना दैनिक हजेरीच्या आधारावर निलंबन कालावधीचे वेतन नियमानुसार दिले जाईल. हे वेतन किती असेल याचा खुलासा राणा यांनी केला नाही. तथापि, निलंबन कालावधीत साधारणत: मूळ वेतनाच्या ५० टक्के हिस्सा आणि महागाई भत्ता दिला जातो. साहिबाबाद येथील हा प्रकल्प कंपनीचा सर्वांत मोठा सायकल उत्पादक प्रकल्प होता. येथे १९८९ मध्ये सायकल उत्पादन सुरू करण्यात आले होते. येथे दरमहा दोन लाखांपेक्षा अधिक सायकलींचे उत्पादन होत होते. दरम्यान, कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता कारखाना बंद केल्याचा आरोप कर्मचाºयांनी केला आहे.च्कंपनीने बुधवारी गेटवर चिकटवलेल्या नोटिसीत म्हटले की, गेल्या अनेक वर्षांपासून कंपनी भांडवलासाठी संघर्ष करीत आहे. कारखाना चालविण्यासाठीही कंपनीकडे पैसे नाहीत.च्कच्चा माल खरेदी करण्यातही आम्ही असमर्थ आहोत. अशा परिस्थितीत कारखाना चालू ठेवणे अशक्य आहे. कर्मचाºयांना सुट्या वगळून हजेरी भरण्यास सांगण्यात आले आहे.