शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

Rajya Sabha: मला विरोधक, सत्ताधारी दोन्ही प्रिय! व्यंकय्या नायडू दोषी राज्यसभा खासदारांवर कारवाईच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 3:28 PM

Rajya Sabha uproar: नायडू यांनी गुरुवारी मार्शलांची नियुक्तीवर अहवाल मागविला होता. यानंतर सायंकाळी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली होती. तसेच मार्शलांकडूनही उत्तर मागविण्यात आले होते.

नवी दिल्ली: मंगळवार आणि बुधवारी राज्यसभेत  (Rajya Sabha) झालेल्य़ा गोंधळ, धक्काबुक्कीवर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांनी कठोर भूमिका घेतली आहे. नायडू यांनी गुरुवारी मार्शलांची नियुक्तीवर अहवाल मागविला होता. यानंतर सायंकाळी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली होती. तसेच मार्शलांकडूनही उत्तर मागविण्यात आले होते. (Venkaiah Naidu hints action on Rajyasabha members who involeved in rajya sabha uproar.)

Rajya Sabha: राज्यसभेत नेमके काय घडले; आरोपांच्या फैरीनंतर मार्शल आले समोर, लेखी दिले

राज्यसभेत घडलेल्या या प्रकाराबाबत सर्व बाबींवर विचार करण्यात आला आहे. यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल. माझ्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही माझ्या डोळ्यांसारखे आहेत. माझ्या नजरेत दोन्ही सारखेच आहेत. दोन्ही डोळे असतील तरच योग्य पद्धतीने पाहता येईल, असे व्यंकय्या नायडू यांनी सांगितले.सभागृहाचे कामकाज योग्य रितीने चालावे ही दोन्ही बाजुंची जबाबदारी आहे. येथे बाहेरील राजकीय लढाया लढू नयेत, असे म्हटले.

 

दुसरीकडे सुत्रांनी एएनआयला सांगितले की, हे प्रकरण आता विशेषाधिकार समितीकडे पाठविले जाईल किंवा नवीन समिती बनविली जाईल. नायडू यांनी सांगितले की, यावर विस्तृत चर्चा केली जात आहे. यावर योग्य कारवाई केली जाईल. अशाप्रकारचे कोणतेही मतभेद झाले तर सभागृह मिळून निर्णय घेते. मला सत्ताधारी, विरोधक दोन्ही तेवढेच प्रिय आहेत, असे संकेत नायडू यांनी दिले. 

विरोधकांचे आरोप काय?काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी आरोप केला होता की, राज्यसभेत जेवढे सदस्य नव्हते त्यापेक्षा जास्त संख्येने मार्शल हजर होते. पुरुष मार्शलांन महिला खासदारांनाही धक्काबुक्की केली. हे मार्शल संसदेतील नव्हते तर बाहेरील होते. यावर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांची काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह विरोधकांनी भेट घेतली होती. 10 ऑगस्टपासूनच राज्यसभेत अधिक संख्येने सुरक्ष रक्षक तैनात केले होते, जे सामान्य कामकाजाच्या दिवशी कधीही तिथे नव्हते. 

Rajya Sabha: राज्यसभेत त्या दिवशी मार्शल नव्हते, बाहेरचे लोक? व्यंकय्या नायडूंना मिळाला रिपोर्ट

अधिकारी काय म्हणाले...यावर नायडू यांनी अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला होता. संसदेच्या स्टाफने यावर खुलासा पाठविला आहे. 10 ऑगस्टला कोणत्याही बाहेरील व्यक्तीला मार्शल म्हणून तैनात करण्यात आले नव्हते. लोकसभेत आणि राज्यसभेत फक्त लक्ष ठेवण्यासाठी  आणि वॉर्ड स्टाफ असलेल्या कर्मचाऱ्यांना मार्शल म्हणून तैनात केले होते. मार्शल किती असावेत किंवा ठेवावेत याची संख्या गरजेनुसार ठरविली जाते. हे मार्शल 14 ते 42 एवढ्या संख्येने असू शकतात. सर्वकाही कामकाजावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असते, असे अहवालात म्हटले आहे. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाVenkaiah Naiduव्यंकय्या नायडूcongressकाँग्रेसBJPभाजपा