शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

विजय मल्ल्यासाठी आर्थर रोड कारागृहात सर्व सुविधा, महाराष्ट्र सरकारने पाठवले कारागृहाचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 1:47 PM

विजय मल्ल्या यांची आर्थर रोड कारागृहात रवानगी झाल्यास बराक क्रमांक 12 मध्ये ठेवण्यात येणार आहे. याच ठिकाणी मुंबई 26/11 हल्ल्यात पकडण्यात आलेला एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाबला ठेवण्यात आलं होतं. 

ठळक मुद्देविजय मल्ल्या यांची आर्थर रोड कारागृहात रवानगी झाल्यास बराक क्रमांक 12 मध्ये ठेवण्यात येणारयाच ठिकाणी मुंबई 26/11 हल्ल्यात पकडण्यात आलेला एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाबला ठेवण्यात आलं होतंराष्ट्रवादी नेते छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि पीटर मुखर्जी याच बराकमध्ये आहेत

लंडन - भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून ब्रिटनमध्ये स्थायिक झालेले कर्जबुडवे विजय मल्ल्या यांचा भारतीय कारगृह योग्य नसल्याचा दावा खोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आर्थर रोड जेलचे फोटो पाठवले आहेत. राज्य सरकारने आर्थर रोड जेलमधील बराक क्रमांक 12 चे फोटो पाठवले असून, युरोपमधील कारागृहात असतात त्या सर्व सुविधा येथे असल्याची माहितीही दिली आहे. विजय मल्ल्या यांची आर्थर रोड कारागृहात रवानगी झाल्यास बराक क्रमांक 12 मध्ये ठेवण्यात येणार आहे. याच ठिकाणी मुंबई 26/11 हल्ल्यात पकडण्यात आलेला एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाबला ठेवण्यात आलं होतं. 

'आम्ही सर्व महत्वाच्या कागदपत्रांसोबत केंद्राला अहवाल पाठवला आहे', अशी माहिती कारागृह अतिरिक्त पोलीस महासंचालक बी के उपाध्याय यांनी दिली आहे. 

सक्तवसुली संचलनालयाने विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाच्या केलेल्या मागणीवर युक्तीवाद करताना मल्ल्याच्या वकिलाने आपल्या आशिलाची विशेष काळजी घेण्याची गरज असून, डायबेटिज असल्या कारणाने घरचं जेवणं मिळणं गरजेचं असल्याचं सांगितलं. सोबतच कारागृहांमध्ये शौचालयांची दुरावस्था आणि सरकारी रुग्णालयांमधील असुविधांना मुद्दाही मल्ल्याच्या वकिलाने उपस्थित केला. 

राज्य सरकारने मल्ल्याच्या वकिलाचा दावा फेटाळून लावला आहे. न्यायालयाने आदेश दिल्यास मल्ल्यावरील कारवाई सुरु असताना आर्थर रोड कारागृहात घरचं जेवण दिलं जाऊ शकतं असं सांगितलं आहे. जर मल्ल्या दोषी सिद्ध झाला तर त्याला कारागृहाच्या जेवणाशिवाय पर्याय नसेल. 

कारागृह प्रशासनाने मल्ल्याला हवं असेल तर युरोपिअन पद्धतीचं शौचालय बांधण्यास तयार असल्याचंही सांगितलं आहे. 'आम्ही आर्थर रोड कारागृहात आधीपासूनच काही ज्येष्ठ कैद्यांना युरोपिअन पद्दतीच्या शौचालयाची सुविधा दिली आहे. बराक क्रमांक 12 मध्येही अशा सुविधा आहेत. आम्ही मल्ल्याला या बराकमध्ये ठेऊ किंवा त्याच्यासाठी एक विशेष बांधू', अशी माहिती गृहमंत्रालयाच्या अधिका-याने दिली आहे. 

बराक क्रमांक 12 मध्ये एकूण 12 कैद्यांसाठी जागा आहे. सध्या राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि पीटर मुखर्जी या बराकमध्ये आहेत. 1925 रोजी बांधकाम करण्यात आलेल्या आर्थर रोड कारागृहाची 804 कैद्यांची क्षमता आहे. मात्र सध्या तिथे 2500 कैद्यांना ठेवण्यात आलं आहे. 

मल्ल्यांचं पलायन - मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्ससाठी स्टेट बँकेसह 17 बँकांनी कर्ज दिले होते. स्टेट बँक या सर्व बँकांचे नेतृत्व करत आहे. सर्व बँकांचे मिळून तब्बल 9000 करोड रुपये किंगफिशर एअरलाईन्सने थकवले आहेत. 2 मार्चला विजय मल्ल्या दुपारी 1.30 वाजता जेट एअरवेजच्या दिल्ली - लंडन ‘9W 122’ विमानाने रवाना झाले होते. विजय मल्ल्या यांना देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात १७ सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने याचिका केली होती, मात्र विजय मल्ल्या अगोदरच देश सोडून रवाना झाल्याची माहिती ऍटर्नी जनरल यांनी न्यायालयात दिली होती.. 

टॅग्स :Vijay Mallyaविजय मल्ल्या