शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
6
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
7
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
8
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
9
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
10
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
11
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
12
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
13
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
14
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
15
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
16
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
17
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
18
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
19
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
20
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा

प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या शपथविधीदरम्यान विरोधकांचा लोकसभेत गोंधळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 5:50 PM

भाजपाच्या वादग्रस्त खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर या शपथ घेत असताना लोकसभेमध्ये जोरदार गोंधळ झाला. 

नवी दिल्ली - लोकसभेच्या निवडणुकीनंतर संसदेच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून, लोकसभेमध्ये नवनियुक्त खासदारांच्या शपथविधीची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, या शपथविधीवेळी भाजपाच्या वादग्रस्त खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर या शपथ घेत असताना लोकसभेमध्ये जोरदार गोंधळ झाला. प्रज्ञा सिंह ठाकूर या शपथ घेण्यासाठी आल्यावर विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. विरोधी पक्षातील सदस्यांनी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या नावास आक्षेप घेतला. प्रज्ञा सिंह या संस्कृत भाषेत शपथ घेत होत्या. त्यांनी संस्कृतमध्ये आपले नाव उच्चारताच विरोधी पक्षांकडून विरोधात सुरुवात झाली. प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी शपथ घेताना केवळ स्वत:चे नाव घ्यावे, अशी मागणी विरोधकांनी केली.मी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर स्वामी पूर्णचेतनानंद अवधेशानंद गिरी, असा नामोल्लेख प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला होता. त्यानंतर विरोधकांनी आक्षेप घेतला.  त्यानंतर प्रज्ञा  सिंह यांनी आपला शपथविधी थांबवला. त्यानंतर लोकसभेत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना शपथेदरम्यान वडलांचे नावही घेण्यास सांगितले. त्यानंतर प्रज्ञा सिंह यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतानाही गोंधळ झाला. यादरम्यान प्रोटेम स्पीकर यांनी प्रज्ञा सिंह यांच्याकडून त्यांचे विजयी झाल्याचे प्रमाणपत्रही मागून घेतले. अखेरीस विरोधी पक्षांच्या सदस्यांना आवरत प्रोटेम स्पीकर यांनी  प्रज्ञा सिंह ठाकूर यांना तिसऱ्यांदा शपथ घेण्याची संधी दिली. त्यानंतर त्यांचा शपथविधी पूर्ण झाला.  

टॅग्स :Sadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञाlok sabhaलोकसभा