शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

विरोधकांकडे ना नेता, ना निती, ना रणनिती; भाजपाचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2018 3:21 PM

विरोधकांच्या एकजुटीवर भाजपाची जोरदार टीका

नवी दिल्ली : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या तयारीला लागलेल्या भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत व्हिजन 2022 सादर करण्यात आलं. यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी विरोधकांच्या एकजुटीवर निशाणा साधला. विरोधकांकडे नेता, निती आणि रणनिती यापैकी काहीही नसल्याची टीका त्यांनी केली. हताश झालेल्या विरोधकांकडून सध्या नकारात्मक राजकारण सुरू असल्याचंदेखील त्यांनी म्हटलं. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राजकीय प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव कार्यकारणीनं एकमतानं मंजूर केला. 2022 पर्यंत 'न्यू इंडिया' साकारण्याच्या मुद्द्याचा समावेश या प्रस्तावात आहे. राजकीय प्रस्तावात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाचं कौतुक करण्यात आलं असून 'न्यू इंडिया'चा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. न्यू इंडियामध्ये ना कोणी गरीब असेल, ना कोणी बेघर असेल, असं भाजपाकडून सांगण्यात आलं आहे. देशात आज नवनिर्मितीचं वातावरण असल्याची माहिती राजकीय प्रस्तावात असल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. देशातील जनता स्वत:ची प्रगती करत देशाच्या विकासात मोठा वाटा उचलत आहेत, असंही ते म्हणाले. यावेळी जावडेकर यांनी मोदींवर स्तुतीसुमनं उधळली. मोदी हे आजच्या घडीला जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत. साडेचार वर्षे सत्तेत राहूनही त्यांची लोकप्रियता 70 टक्के आहे. देशातच काय, जगात याआधी असं कुठेही घडलेलं नाही, असा दावादेखील त्यांनी केला.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहBJPभाजपाcongressकाँग्रेसPrakash Javadekarप्रकाश जावडेकर