शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

सरकारविरुद्ध विरोधक संसदेत, रस्त्यांवरही होणार आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 05:56 IST

हिवाळी अधिवेशन; वाढती बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांवरून सामूहिक रणनीती

शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : देशात वाढती बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांवरून सामूहिक रणनीती अंतर्गत संसदेच्या हिवाळी अधिवेशात संसदेत आणि संसदेबाहेर सरकारविरोधात विरोधक आक्रमक होणार आहेत. हा निर्णय सोमवारी १३ राजकीय पक्षांनी आपल्या एकत्रित बैठकीत घेतला. या पक्षांचे म्हणणे होते की, वेळेअभावी इतर पक्षांसोबत समन्वय न झाल्यामुळे काही पक्ष बैठकीला उपस्थित राहू शकलेले नाहीत. त्यामुळे सरकारवर केल्या जाणाºया ‘हल्ला बोल’ची अंतिम रणनीती हिवाळी अधिवेशनात निश्चित केली जाईल.

बैठकीनंतर काँग्रेसचे गुलाम नबी आझाद यांनी स्पष्ट केले की, सगळ््या पक्षांचे मत होते की जोपर्यंत सर्वांचे एकच धोरण ठरवून सरकारवर हल्ला केला जाणार नाही तोपर्यंत सरकार हलणार नाही. त्यांनी वाढती बेरोजगारी, वाईट होत चाललेली अर्थव्यवस्था, मुक्त व्यापार करारासारख्या मुद्यांवर भर देऊन म्हटले की, नोटाबंदीनंतर देश सगळ््यात वाईट कालखंडातून प्रवास करीत आहे. खासगी गुंतवणूक घसरत चालली आहे, वसूल न होणारे कर्ज आठ लाख कोटीं रूपयांपर्यंत गेले आहे, बँक घोटाळ््यांची संख्या वाढून २५ हजार झाली आहे तरीही मोदी सरकार महसूल गिळाल्यानंतर आता रिझर्व्ह बँकेच्या तिजोरीवर दरोडा टाकत आहे, असे आझाद म्हणाले.जगात जेवढी सरासरी बेरोजगारी आहे त्याच्या दोनपट बेरोजगारी भारतात आहे. सरकारी आकडे वस्तुस्थितीपासून दूर आहेत.शरद यादव यांचे म्हणणे होते की, देशाची परिस्थिती इतकी बिघडली आहे की, आता लोकांनाच एकत्र यावे लागेल. हरयाणा आणि महाराष्ट्रातील निवडणुकांत मतदारांनी जो जनादेश दिला त्यातून लोकांना आता घराबाहेर यायचे आहे याचे संकेत मिळतात. आता नेत्यांची जबाबदारी ही आहे की लोकांच्या भावना समजून देशभर आंदोलन उभे करावे.

बैठकीत १३ पक्षांचे नेते उपस्थित होते. त्यात गुलाम नबी आझाद, अहमद पटेल, रणदीप सूरजेवाला (काँग्रेस), डी. कुपेंद्र रेड्डी (जेडीएस), शरद यादव (एलजेडी), टीआर बालू (डीएमके), मनोज झा (आरजेडी), नदिमुल्ला हक (टीएमसी), अजित सिंह (आरएलडी), टी. के. रंगराजन (सीपीआईएम), डी. राजा (सीपीआय), उपेंद्र कुशवाहा (आरएलएसपी), पी. के. कुनहलकुट्टी (आईयूएमएन), के. मणी (केसीएग) आणि शत्रुजीत सिंह (आरएसपी).

टॅग्स :GovernmentसरकारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस