शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
3
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
4
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
5
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
6
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
7
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
8
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
9
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
10
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
11
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
12
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
13
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
14
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
15
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
16
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
17
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
18
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
19
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
20
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!

ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 14:52 IST

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवणाऱ्या 10 हेरांना पकडले आहे.

Pakistani Spies in India List: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील गुप्तचर संस्था पूर्णपणे सतर्क आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर 8 मे पासून सुरक्षा यंत्रणांनी दहा हेरांना अटक केली आहे. हे सर्वजण पाकिस्तानसोबत संवेदनशील माहिती शेअर करत असल्याचा आरोप आहे. सुरक्षा एजन्सी पाकिस्तानशी संबंध असलेल्या आणखी अनेक लोकांचा शोध घेत आहेत.

पंजाबमधून गजाला आणि यामीन मोहम्मद यांना अटकसर्वप्रथम पंजाबमधून गजाला आणि यामीन मोहम्मद या दोन हेरांना पकडण्यात आले. या दोन्ही हेरांना पंजाबच्या मालेरकोटला पोलिसांनी अटक केली. या दोघांना अटक केल्यानंतर नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात काम करणारा दानिश त्यांना भेटल्याचे समोर आले. ते पाकिस्तानचा व्हिसा मिळवण्यासाठी त्याच्याकडे जात असे. एवढेच नाही तर दानिशने त्याच्या मोबाईलवर ऑनलाइन पैसेही ट्रान्सफर केले आहेत.

नोमान इलाही14 मे रोजी पंजाब पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या नोमान इलाहीला अटक केली. नोमानची अजूनही चौकशी सुरू आहे. नोमान पाकिस्तानच्या काही एजंटांच्या संपर्कात असल्याचा आरोप आहे. 

देविंदरसिंग धिल्लॉनला हरियाणातील कैथल जिल्ह्यातून देविंदरसिंग ढिल्लॉन यालाही अटक करण्यात आली आहे. त्याने भारताच्या लष्करी ऑपरेशन सिंदूर आणि लष्कराच्या कारवायांशी संबंधित माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप आहे. आरोपीने कबूल केले की, तो करतारपूर साहिब, नानकाना साहिब, लाहोर आणि पंजासाहिब यासारख्या धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी गेला होता. याच काळात तो पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात आला.

युट्यूबर ज्योतीपाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली हरियाणाच्या हिसार पोलिसांनी युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक केली आहे. ज्योती पाकिस्तान उच्चायुक्तालयात काम करणाऱ्या दानिश नावाच्या अधिकाऱ्याच्या संपर्कात होती. दानिशला भारत सरकारने 13 मे रोजी देश सोडण्यास सांगितले होते. ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती पाकिस्तानला गुप्त माहिती शेअर करत होती. 2023 मध्ये तिने पहिल्यांदा पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यानंतर तीवेळा पाकिस्तानला गेली. ज्योतीची पाच दिवसांच्या रिमांडवर चौकशी सुरू आहे.

अरमान पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या अरमानला नागेना पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या राजाका गावातून अटक करण्यात आली आहे. तो व्हॉट्सअॅपद्वारे देशाच्या लष्करी कारवायांची माहिती पाकिस्तानला पाठवत असे, असा आरोप आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध देशद्रोहाच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. त्याची सतत चौकशी केली जात आहे.

यूट्यूबर प्रियांका सेनापतीचीही चौकशी सुरूपुरी येथील युट्यूबर प्रियंका सेनापती हिचीही चौकशी एजन्सींकडून चौकशी केली जात आहे. सप्टेंबर 2024 मध्ये ज्योती मल्होत्रा ​​पुरीला गेली होती. याच काळात तिची प्रियांकासोबत भेट झाली. आता एजन्सी हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत की, प्रियांकाला ज्योतीच्या कारवायांची माहिती होती का, किंवा ती यात सामील आहे का?

नवांकुर चौधरीयुट्यूबर नवांकुर चौधरीवरही पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पण, त्याने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

शहजादउत्तर प्रदेशातील रामपूर येथील व्यापारी शहजादला रविवारी स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) ने मुरादाबाद येथून अटक केली. एसटीएफने सांगितले की, त्याने राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील माहिती त्याच्या मालकांना दिली होती. तो अनेक वेळा पाकिस्तानला गेला होता आणि कपडे आणि मसाल्यांच्या तस्करीत सहभागी असल्याचा आरोप आहे.

मोहम्मद मुर्तझा अली गुजरात पोलिसांनी जालंधरमध्ये छापा टाकून मोहम्मद मुर्तजा अलीला अटक केली. तो पाकिस्तानच्या आयएसआयसाठी हेरगिरी करत असल्याच्या गुप्तचर माहितीच्या आधारे त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चार मोबाईल फोन आणि तीन सिम कार्ड जप्त करण्यात आले आहेत.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानIndiaभारत