Operation Sindoor: भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'बाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. सैन्याच्या कारवाईदरम्यान, पाकिस्ताननं नियंत्रण रेषेजवळ (LoC) असलेल्या उरी हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टवर ड्रोन व क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता. मात्र, CISF च्या जवानांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जबरदस्त शौर्य दाखवत हा हल्ला परतवून लावला. जवानांनी ड्रोन निष्क्रिय केले, महत्त्वाच्या उपकरणांचे संरक्षण केले आणि गोळीबाराच्या माऱ्यातून सुमारे 250 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. या शूर जवानांचा आता गौरव करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, भारतीय सैन्याने 6-7 मेच्या रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर जबरदस्त हल्ले केले होते. त्यानंतर पाकिस्तानी सैन्यानं प्रत्युत्तर म्हणून सीमाभागात भारी गोळीबार सुरू केला. उरी हायड्रो प्रकल्प LoC पासून केवळ काही किलोमीटर अंतरावर असल्याने हा प्रकल्प आण जवळील वस्ती धोक्यात आली. CISF चे युनिट या भागात LoC पासून अवघ्या 8-10 किमी अंतरावर तैनात असून, अचानक निर्माण झालेल्या तणावात त्यांनी अतिशय हुशारीने परिस्थिती हाताळली.
19 जवानांना DG डिस्कने सन्मान
CISF ने मंगळवारी माहिती देताना सांगितले की, संघर्षाच्या वेळी दाखवलेल्या धाडसासाठी 19 जवानांना डायरेक्टर जनरल डिस्क प्रदान करण्यात आले आहे. या जवानांमध्ये खालील अधिकाऱ्यांचा समावेश आहे:
कमांडंट रवी यादव (UHEP उरी-I)
डिप्टी कमांडंट मनोहर सिंह (UHEP उरी-II)
असिस्टंट कमांडंट सुभाष कुमार (UHEP उरी-II)
त्यांच्यासोबत अनेक हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल आणि निरीक्षक सामील असून त्यांनी संयुक्तपणे प्रकल्प तसेच आसपासच्या लोकांचे रक्षण केले.
घराघरांत जाऊन 250 नागरिकांची सुटका
CISF ने सांगितले की, जवानांनी फक्त हायड्रो प्रकल्पाची सुरक्षा केली नाही, तर या परिसरातील घराघरात जाऊन स्थानिकांना सुरक्षित ठिकाणे हलवले. या धाडसी आणि तत्पर कारवाईमुळे एकही जीवितहानी झाली नाही.
CISF चे काम...
CISF (स्थापना: 10 मार्च 1969) देशातील औद्योगिक, पायाभूत व संवेदनशील प्रतिष्ठानांची सुरक्षा करणारी प्रमुख सशस्त्र फोर्स आहे. त्यांच्या संरक्षणाखाली विमानतळे, दिल्ली मेट्रो, ताजमहल, लाल किल्ला, अणुऊर्जा केंद्रे, उत्पादन युनिट्स, मोठे बंदरे, शिपयार्ड्स, महत्त्वाचे पावर प्लांट्स यांचा समावेश आहे.
Web Summary : During Operation Sindoor, Pakistan attacked the Uri Hydro project. CISF bravely defended it, neutralizing drones, protecting equipment, and rescuing 250 civilians. Nineteen CISF personnel were honored for their courage.
Web Summary : ऑपरेशन सिंदूर के दौरान, पाकिस्तान ने उरी हाइड्रो परियोजना पर हमला किया। CISF ने बहादुरी से बचाव करते हुए ड्रोन को निष्क्रिय किया, उपकरणों की सुरक्षा की और 250 नागरिकों को बचाया। उन्नीस CISF कर्मियों को उनकी बहादुरी के लिए सम्मानित किया गया।