Operation Sindoor : "जे काही घडलं ते बरोबर, पहलगाममध्ये धर्म विचारणाऱ्या ४ दहशतवाद्यांचाही केला पाहिजे खात्मा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 14:45 IST2025-05-07T14:45:08+5:302025-05-07T14:45:31+5:30

Operation Sindoor : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या एका महिलेने ऑपरेशन सिंदूर हे अगदी योग्य असल्याचं म्हटलं आहे.

operation sindoor pahalgam attack victim asks indian government to kill baisran valley attack terrorists | Operation Sindoor : "जे काही घडलं ते बरोबर, पहलगाममध्ये धर्म विचारणाऱ्या ४ दहशतवाद्यांचाही केला पाहिजे खात्मा"

Operation Sindoor : "जे काही घडलं ते बरोबर, पहलगाममध्ये धर्म विचारणाऱ्या ४ दहशतवाद्यांचाही केला पाहिजे खात्मा"

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या एका महिलेने ऑपरेशन सिंदूर हे अगदी योग्य असल्याचं म्हटलं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या चार दहशतवाद्यांनाही संपवलं पाहिजे, ज्यांनी धर्म विचारून पतीची हत्या केली  असं म्हटलं. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी तळांवर केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

२२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाममधील मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन या प्रमुख पर्यटन स्थळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला, ज्यामध्ये २६ लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये इंदूर येथील सुशील नथानिएल (५८) यांचा समावेश होता. जेनिफर नथानिएल यांनी ऑपरेशन सिंदूरवर  "जे काही घडलं ते बरोबर आहे, पण पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या, धर्म विचारणाऱ्या चार दहशतवाद्यांचाही खात्मा केला पाहिजे."

"मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना

"या चौघांनी असं काम केलं जे एखादा प्राणीही करू शकत नाही. मला फक्त याचा हिशोब हवा आहे आणि या लोकांनाही तशीच शिक्षा मिळाली पाहिजे. या दहशतवाद्यांनाही मारायला हवं" असं म्हटलं आहे. सुशील नथानिएल हे LEC मध्ये कार्यरत होते. ते त्यांची पत्नी जेनिफर, मुलगी आकांक्षा (३५) आणि मुलगा ऑस्टिन उर्फ ​​गोल्डी (२५) यांच्यासोबत काश्मीरला फिरायला गेले होते. पण दहशतवादी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. 

अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?

भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. काल रात्री भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. लष्कराने मिसाईल अटॅक करून दहशतवाद्यांच्या ९ अड्ड्यांना लक्ष्य केलं. या यामध्ये जैश आणि हिजबुल सारख्या दहशतवादी संघटनांचे मुख्यालय आणि लपण्याची ठिकाणे देखील समाविष्ट आहेत. याला 'ऑपरेशन सिंदूर' असं नाव देण्यात आलं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर, काल रात्री हा हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. 
 

Web Title: operation sindoor pahalgam attack victim asks indian government to kill baisran valley attack terrorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.