Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 15:17 IST2025-05-10T15:16:56+5:302025-05-10T15:17:14+5:30
Operation Sindoor And Sofia Qureshi : सोफिया कुरेशी यांनी 'ऑपरेशन सिंदूर' वर मीडिया ब्रीफिंग केल्यानंतर, त्यांचे सासरे गौसब बागेवाडी यांचं विधान प्रत्येक भारतीयाच्या मनाला स्पर्शून गेलं आहे.

Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
कर्नल सोफिया कुरेशी यांनी 'ऑपरेशन सिंदूर' वर मीडिया ब्रीफिंग केल्यानंतर, त्यांचे सासरे गौसब बागेवाडी यांचं विधान प्रत्येक भारतीयाच्या मनाला स्पर्शून गेलं आहे. कर्नाटकातील बेलागावी जिल्ह्यातील कोन्नूर गावातील रहिवासी असलेले गौसब साहेब म्हणाले की, "माझ्या सुनेचा मला अभिमान वाटत आहे. ती सहा महिन्यांपूर्वी गावाला आली होती. आज गावातील लोक माझं अभिनंदन करण्यासाठी मला भेटायला येत आहेत. मला खूप आनंद झाला आहे."
गौसब साहेब यांनी आपल्या मुलाशी संवाद साधला, जे स्वतः भारतीय सैन्यात अधिकारी आहे. मुलाने त्यांना धीर दिला आणि सांगितलं की त्यांची काळजी करण्याची गरज नाही. कर्नल सोफिया कुरेशी या भारतीय लष्कराच्या सिग्नल कोरच्या अधिकारी आहेत. त्या अशा कुटुंबातील आहे ज्यांनी पिढ्यानपिढ्या सैन्यात सेवा केली आहे आणि लहान वयातच देशाची सेवा करण्याचं स्वप्न पाहिलं होतं.
#WATCH | बेलगावी, कर्नाटक: कर्नल सोफिया कुरैशी ने आज मीडिया को #OperationSindoor के बारे में जानकारी दी।
— ANI_HindiNews (@AHindinews) May 8, 2025
उनके ससुर, गौसाब बागेवाड़ी ने कहा, "मेरी बहू ने मुझे गौरवान्वित किया है... वह करीब 6 महीने पहले यहां आई थी। गांव के लोग मुझसे मिल रहे हैं और मुझे बधाई दे रहे हैं। मैं अभी… pic.twitter.com/x9FmDf0xE5
भारताची नारी शक्ती! सोशल मीडियावर सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा दबादबा, होतंय कौतुक
सोफिया कुरेशी यांचे पती कर्नल ताजुद्दीन बागेवाडी हे देखील भारतीय सैन्यात अधिकारी आहेत आणि ते कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील कोन्नूर गावचे रहिवासी आहेत. सासरे गौसब बागेवाडी यांनी अभिमानाने सांगितलं की, गावात उत्साहाचं, जल्लोषाचं वातावरण आहे आणि संपूर्ण कुटुंबाला त्यांचा अभिमान आहे. ७ आणि ८ मे २०२५ च्या रात्री, जेव्हा भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेल्या ९ दहशतवादी तळांवर कारवाई केली.
बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटूंबियांना अभिमान
काही तासांनंतर देशवासीयांना पहिल्यांदाच याची माहिती देण्यात आली. ही माहिती कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह या दोन महिला लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. सोफिया कुरेशी यांची बहीण शायना सुनसारा या भावुक झाल्या. सोफिया यांचा त्यांना अभिमान वाटत आहे. शायना यांनी सांगितलं की, “आम्ही काल बोललो आणि एक आर्मी ऑफिसर असल्यामुळे तिने घडलेल्या घटनेबद्दल एकही शब्द सांगितला नाही. हे आमच्या सर्वांसाठी आश्चर्यकारक होतं, पण सोफियाला या पदावर पाहणं अभिमानाची गोष्ट होती."
“देशासाठी काहीतरी करण्याची तिचं नेहमीच ध्येय होतं. तिला डीआरडीओमध्ये सामील व्हायचं होतं, शास्त्रज्ञ व्हायचं होतं आणि डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यासोबत काम करायचं होतं. तिला अमेरिकेतूनही अनेक ऑफर आल्या होत्या, पण तिला भारतात राहून सैन्यात भरती व्हायचं होतं. ती पहिल्याच प्रयत्नात सैन्यात सामील झाली. सुरुवातीला माझं स्वप्न सैन्यात भरती होण्याचं होतं, पण एनसीसीमध्ये असूनही आणि सर्व प्रयत्न करूनही माझी निवड झाली नाही. मला अजूनही वाईट वाटतं, पण जेव्हा मी सोफियाला वर्दीत पाहते तेव्हा असं वाटतं की मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगत आहे” असं शायना यांनी म्हटलं आहे.