शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 23:36 IST2025-05-08T23:28:03+5:302025-05-08T23:36:15+5:30
Operation Sindoor S-400 Defence System: रशियाची एअर डिफेन्स सिस्टीम खरेदी करण्याच्या भारताच्या प्रयत्नांत अमेरिकेने खोडा घालण्याचा प्रयत्न केला होता. अमेरिकेला त्यांची एअऱ डिफेन्स सिस्टीम भारताच्या गळ्यात मारायची होती.

शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
पाकिस्तानने सलग दोन रात्री भारतावर ड्रोन, मिसाईल आणि लढाऊ विमानांनी भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. शेकडो आत्मघाती ड्रोन, मिसाईल आणि लढाऊ विमाने पाडण्यात भारताने रशियाकडून खरेदी केलेल्या S-400 ची मोठी भूमिका राहिली आहे. ही डील झालीच नसती तर आज भारताचे प्रचंड नुकसान झाले असते. भारताने विकसित केलेल्या डिफेन्स सिस्टीमदेखील हा हल्ला परतवण्यासाठी वापरण्यात आल्या आहेत.
रशियाची एअर डिफेन्स सिस्टीम खरेदी करण्याच्या भारताच्या प्रयत्नांत अमेरिकेने खोडा घालण्याचा प्रयत्न केला होता. अमेरिकेला त्यांची एअऱ डिफेन्स सिस्टीम भारताच्या गळ्यात मारायची होती. यासाठी अमेरिकेने रशियाची डिफेन्स सिस्टिम खरेदी न करण्यासाठी भारतावर निर्बंध घालण्याचा आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. परंतू, भारताने अनेक दशकांपासूनचा पाठीराखा असलेल्या रशियाचीच सिस्टीम खरेदी केली. यामुळे अमेरिका नाराज झाला होता.
रशिया वेळोवेळी भारताच्या मदतीला धावून आला आहे. बांगलादेश स्वतंत्र करण्याच्या युद्धावेळीदेखील अमेरिका भारतावर चाल करून येत होता. रशियाला समजताच रशियाने अमेरिकेच्या जपानहून निघालेल्या विमानवाहू युद्धनौकेचा पाठलाग सुरु केला. आपल्या युद्धनौका मागचा पुढचा विचार न करता अमेरिकेच्या मागे लावल्या. यामुळे अमेरिकेच्या युद्धनौकेला भारतावर हल्ला करणे जमले नाही आणि पाकिस्तानने मदत मिळाली नाही म्हणून शरणागती पत्करली होती. यापूर्वीही अनेकदा अमरिकेने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, वेळोवेळी पाकिस्तानची बाजू घेत त्यांना मदत केली आहे.
जर भारताने अमेरिकेच्या दबावाला झुगारून रशियाची डिफेन्स सिस्टिम खरेदी केली नसती तर आज चंदीगढ, जम्मू, जैसलमेर, पठाणकोटचे चित्र वेगळे असले असते. परंतू, रशियाच्या मैत्रीने पुन्हा एकदा भारताला वाचविले आहे. भारताने शेकडो ड्रोन, मिसाईल हवेतच नष्ट केली आहेत. यामुळे कितीही दबाव आला तरी रशिया हा भारताचा मित्र राहणार आहे.