Operation Sindoor fact check: सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या युगात बनावट बातम्या आवणव्यासारख्या पसरतात. आता ताजे प्रकरण देशाचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्याबाबतचे आहे. केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूरची माहिती लीक केल्याचा आरोप केरळ काँग्रेसने केला आहे. त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर जयशंकर यांचा एक 19 सेकंदांचा व्हिडिओ पोस्ट केला असून, या व्हिडिओद्वारे हा आरोप केला आहे.
व्हिडिओ बनावट?
व्हायरल व्हिडिओमध्ये वृत्तवाहिनीचा लोगो स्पष्ट दिसत नाही. यात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर मीडियाशी संवाद साधताना दिसत आहेत. याचा ऑडिओदेखील थोडा विचित्र आहे. तुम्ही नीट पाहिले, तर असे दिसते की, परराष्ट्र वेगळंच काहीतरी बोलत आहेत अन् ऑडिओमध्ये वेगळंच काही ऐकू येतंय. केरळ काँग्रेसने x हँडलवर क्लिप शेअर करत सरकारला याचे उत्तर मागितले.
सरकारने पीआयबीच्या फॅक्ट चेकद्वारे याचे उत्तर दिले आहे.
या व्हायरल व्हिडिओला पीआयबीने फॅक्ट चेक केले असून, हा व्हिडिओ बनावट असल्याचे म्हटले आहे.