Operation Sindoor : भारताची नारी शक्ती! सोशल मीडियावर सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा दबादबा, होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 16:16 IST2025-05-07T16:11:45+5:302025-05-07T16:16:19+5:30

Sofiya Qureshi Vyomika Singh Operation Sindoor: कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांचं सोशल मीडियावर लोक भरभरून कौतुक करत आहेत.

Operation Sindoor Colonel Sofiya Qureshi and wing commander vyomika singh shine on social media | Operation Sindoor : भारताची नारी शक्ती! सोशल मीडियावर सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा दबादबा, होतंय कौतुक

Operation Sindoor : भारताची नारी शक्ती! सोशल मीडियावर सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा दबादबा, होतंय कौतुक

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने दहशतवादाविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. एका संयुक्त मोहिमेअंतर्गत, भारताने पाकिस्तानमध्ये असलेल्या एकूण 9 दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले केले. यामुळे संपूर्ण देशाला आनंद झाला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या ब्रीफिंगमध्ये दोन चेहऱ्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं, जे भारताच्या महिला शक्तीचे प्रतीक बनले. 

कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांचं सोशल मीडियावर लोक भरभरून कौतुक करत आहेत. कर्नल सोफिया कुरेशी (Sofiya Qureshi) आणि विंग कमांडर व्योमिका सिंह (Vyomika Singh) या दोन्ही महिला अधिकारींनी भारतीय सैन्याची ताकद आणि शौर्य जगासमोर मांडलं. यासोबतच त्यांनी भारतीय सैन्य पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवादाचा कसा खात्मा करत आहे हे देखील सांगितलं.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या दोन महिला अधिकाऱ्यांची चर्चा होत आहे आणि प्रत्येक भारतीय त्यांचं भरभरून कौतुक करत आहे. सोफिया कुरेशी हा ट्रेंड एक्स वर पाहायला मिळत आहे आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांचंही कौतुक होत आहे. याशिवाय 'नारी शक्ती' देखील ट्रेंडिंगमध्ये आहे. लोक याला भारताच्या नारी शक्तीचं प्रतीक मानत आहेत आणि भारतीय सैन्याच्या पत्रकार परिषदेद्वारे पाकिस्तानलाही संदेश दिला जात आहे की, भारतातील महिला शक्तिशाली आहेत.

सोफिया कुरेशीच यांचे आजोबाही सैन्यात होते. गुजरातच्या रहिवासी असलेल्या सोफिया बायोकेमिस्ट्रीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट आहे. सोफिया १९९९ मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत भारतीय सैन्यात सामील झाल्या. त्यावेळी तो फक्त १७ वर्षांच्या होत्या. सोफिया या लष्कराच्या सिग्नल कॉर्प्समध्येही अधिकारी होत्या. त्यांचे पती मेकॅनाइज्ड इन्फेंट्रीमध्ये आर्मी ऑफिसर आहेत.

Web Title: Operation Sindoor Colonel Sofiya Qureshi and wing commander vyomika singh shine on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.