Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 14:11 IST2025-05-08T13:45:09+5:302025-05-08T14:11:44+5:30
Operation Sindoor : भारताने पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला.

Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
Operation Sindoor ( Marathi News ) : पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने 'ऑपरेश सिंदूर' राबबवले. या अंतर्गत भारताने पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला. या हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने बदला घेतला.
दरम्यान, बिहारच्या कटिहारमधून एक बातमी समोर आली आहे. भारताने घेतलेल्या बदल्याचे कौतुक करत, एका जोडप्याने त्यांच्या नवजात मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले. देशासोबतच नवजात बाळाचे कुटुंबही खूप आनंदी आहे.
'ऑपरेशला सिंदूर' नाव दिले
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. भारताने प्रत्युत्तर दिले. बुधवारी पहाटे, भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले, यात बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचा बालेकिल्ला आणि मुरीदके येथील लष्कर-ए-तोयबाचा अड्डा यांचा समावेश आहे. या हल्ल्याचे सांकेतिक नाव 'ऑपरेशन सिंदूर' होते.
२२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पहलगामला भेट देण्यासाठी आलेल्या लोकांना लक्ष्य केले होते. त्यानंतर संपूर्ण देश संताप व्यक्त केला.
पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
दरम्यान, आज दिल्लीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होणार आहे. यामुळे दिल्लीत हालचालिंना वेग आला आहे, या बैठकीआधी पीएम मोदींची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी भेट घेतली.
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
पंतप्रधान मोदींनी गुरुवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी हेही बैठकीला पोहोचले. बुधवारी भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले केले. बैठक सुरू होण्याच्या काही काळापूर्वीच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. मोदी सरकार दहशतवादावर मोठा हल्ला करणार असल्याचे मानले जात आहे.