हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 16:20 IST2025-05-07T16:20:14+5:302025-05-07T16:20:50+5:30

Operation Sindoor :पाकिस्तानने याला आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन म्हटले आहे.

Operation Sindoor: Another blow to Pakistan after airstrike; Indian Army blows up Neelum-Jhelum dam | हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

Operation Sindoor : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानेऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणांवर हवाई हल्ले केले. या कारवाईत सुमारे शंभर दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतीय लष्कराने पाकला आणखी एक धक्का दिला आहे. पाकिस्तानच्या दाव्यानुसार, सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे जलसाठे नष्ट केले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानमधील 9 ठिकाणी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतीय लष्कराने नीलम नदीच्या नीलम-झेलम धरणावर बॉम्ब टाकले. बॉम्बस्फोटामुळे धरणाचे मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तान येथे वीज निर्मिती करतो. नीलम व्हॅली भारतीय सीमेपासून फक्त 3 किमी अंतरावर आहे. हा भाग पाकव्याप्त काश्मीरचा आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानातील नीलम व्हॅली परिसर सर्वाधिक प्रभावित झाला आहे.

पाकिस्तानने काय म्हटले?
पाकिस्तानी सैन्याचे म्हणणे आहे की, सर्जिकल स्ट्राईकनंतर रात्री 2 वाजता नौसेरी धरणावर बॉम्ब टाकण्यात आला, ज्यामुळे धरणाचे नुकसान झाले. पाकिस्तानने याला आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन म्हटले आहे. मात्र, भारताने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवाद्यांचा मृत्यू 
भारताने फक्त दहशतवाद्यांच्या ठिकाणांवरच हल्ले केले. भारताने केलेल्या हल्ल्यात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात भारताने जैश-ए-मोहम्मदचे 4, लष्कर-ए-तोयबाचे 3 आणि हिजबुल मुजाहिदीनचे 2 तळ उद्ध्वस्त केले. 

दरम्यान, भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2016 मध्ये उरी आणि 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईकही केले होते. उरी सर्जिकल स्ट्राईकमध्ये 250 दहशतवादी मारले गेले होते आणि बालाकोट सर्जिकल स्ट्राईकमध्ये 300 दहशतवादी मारले गेले होते. 

Web Title: Operation Sindoor: Another blow to Pakistan after airstrike; Indian Army blows up Neelum-Jhelum dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.