'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानच्या दोन मित्रराष्ट्रांचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर, जयशंकर यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 15:11 IST2025-05-08T15:10:04+5:302025-05-08T15:11:38+5:30
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारताला अनेक देशांचा पाठिंबा मिळतोय.

'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानच्या दोन मित्रराष्ट्रांचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर, जयशंकर यांची भेट
Operation Sindoor: भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान पाकिस्तानचे मित्रराष्ट्र असलेल्या इराण आणि सौदी अरेबियाचे परराष्ट्र भारत दौऱ्यावर आले आहेत. सौदीचे मंत्री अदेल अलजुबैर यांनी गुरुवारी (8 मे 2025) भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली, ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यावर भर देण्यात आला.
पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारत आणि पाकिस्तानमधील आधीच ताणलेले संबंध आणखी बिकट झाले असताना अलजुबैर भार दौऱ्यावर आले आहेत. या भेटीनंतर जयशंकर यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले की, 'आज सकाळी सौदी अरेबियाचे परराष्ट्र अदेल अलजुबैर यांच्याशी भेट झाली. यादरम्यान दहशतवादाशी लढण्याबाबत चर्चा झाली.'
A good meeting with @AdelAljubeir, Minister of State for Foreign Affairs of Saudi Arabia this morning.
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) May 8, 2025
Shared India’s perspectives on firmly countering terrorism.
🇮🇳 🇸🇦 pic.twitter.com/GGTfItZ3If
दुसरीकडे, भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरघची हेदेखील काल मध्यरात्रीच्या सुमारास पूर्वनियोजित भारत दौऱ्यावर आले आहेत. जयशंकर यांनी अब्बास अरघची यांना थेट सांगितले की, 'आमचा हेतू परिस्थिती बिघडवण्याचा नाही, परंतु जर आमच्यावर लष्करी हल्ला झाला, तर भारत पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देईल यात शंका नाही.' अरघगी दुपारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार आहेत.
My opening remarks at the 20th India-Iran Joint Commission Meeting.
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) May 8, 2025
🇮🇳 🇮🇷
https://t.co/8olxveKYbz
भारताची पाकिस्तानवर स्ट्राईक
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने मंगळवारी मध्यरात्री पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या नऊ छावण्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद (जेईएम) दहशतवादी संघटनेचा बालेकिल्ला असलेल्या बहावलपूर आणि लष्कर-ए-तैयबाचा अड्डा असलेल्या मुरीदकेचा समावेश होता. या हल्ल्यांमध्ये सुमारे शंभर दहशतवादी ठार झाल्याचे सांगितले जात आहे.